Author Topic: सांगा देवा  (Read 1310 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,333
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सांगा देवा
« on: November 18, 2017, 09:41:29 AM »
सांगा देवा

सत्ता न् संपत्ती, वेळेसी सांधली !
कुणा उमजली, ईश्वरेच्छा !!

राग लोभ मोह, कशाचे द्योतक !
होतसे पातक, जीवामाजी !!

जन्मासी तारक, निस्वार्थ ते कर्म !
उपकार धर्म, जनांलागी !!

पाप पुण्य सारे, पुनर्जन्मा योग !
सत्कर्माचा वेग, वाढवावा !!

चुकवूनी फेरा, जन्म कैसा घ्यावा !
विनवतो शिवा, सांगा देवा !!

© शिवाजी सांगळे 🎭
« Last Edit: November 27, 2017, 10:48:57 AM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Deokumar

 • Newbie
 • *
 • Posts: 30
Re: सांगा देवा
« Reply #1 on: February 15, 2018, 05:31:41 PM »
खुप छान.. सर

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,333
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: सांगा देवा
« Reply #2 on: February 17, 2018, 11:15:06 PM »
देवकुमारजी, आपले मनस्वी आभार.