Author Topic: || तथ्य ||  (Read 483 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,324
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
|| तथ्य ||
« on: December 23, 2017, 06:46:24 AM »
|| तथ्य ||

वठविती सोंग । करीत भक्त गोळा ।
घालुनी त्यां माळा । दंभी बुवा ।।

नामा ज्ञाना तुका । वेठीला धरून ।
पाजळती ज्ञान । गावोगावी ।।

मारूनीया थापा । भरताती पोट ।
उठवीती मठ । स्वकल्याणे ।।

ऐशा भोंदू लोकां । पाडोनी उघडे ।
जाहीर वाभाडे । काढावेत ।।

परमेश्वर एक । आहे जो सर्वत्र ।
ठेवा ध्यनी मात्र । अंतर्यामी ।।

वसलाय ईश्वर । परस्परी जाणा ।
हेची सत्य माना । विश्वासाने ।।

अनुभूती घेता । उमगते सत्य ।
तव माना तथ्य । म्हणे शिवा ।।

© शिवाजी सांगळे 🎭

Marathi Kavita : मराठी कविता