Author Topic: खास भेट  (Read 1132 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 557
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
खास भेट
« on: February 14, 2018, 11:10:59 PM »
किती घाई असते तुला
एकाकी मी नसतानाही
किती काळजी असते माझी तुला
काळजी कुणाला तुझी नसतानाही
               ***
तुला विसरून कसे जमेल
स्वतःला विसरून मी जाईल
नाराज करून  तरी कसे चालेल
माझा व्हॅलेन्टाइन व्यर्थ जाईल

              ***
थंडीच्या दिवसात एक
गुलाबी पहाट होते
14 फ्रेबुवारीची जेंव्हा
तुझी माझी भेट होते
             ***
नेहमीची चिडचिड तुझी
नेहमीची बडबड तुझी
आज तरी बंद कर थोडी
हवी "व्हॅलेन्टाइन डे"ला
खास भेट तुझी
            ***
वर्ष येतं वर्ष जातं
तुझ्या माझ्या प्रेमाचंही असंच काहीसं आहे
तरीही स्थैर्यासाठी हृदयाच्या
"आय लव यु" म्हटलं तरी पुरेसं आहे

             ***
« Last Edit: February 15, 2018, 01:49:18 AM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता