Author Topic: जगणे कठीण झाले !!  (Read 372 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 237
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
जगणे कठीण झाले !!
« on: February 07, 2018, 02:29:52 PM »
जगणे कठीण झाले !!
-----------------
जगावे कशाला? जगणे कठीण झाले
ओळखणे माणसा अगदी कठीण झाले
**
देवा सारखा भजला गुरु पूज्य म्हणोनी
बाबा महंत गुरु ओळखणे कठीण झाले
**
नात्यास कलंक असते का कधीतरी
फेकते पोटचा गोळा! आई ओळखणे कठीण झाले
**
बेटी धनाची पेटी म्हणतो आनंदाने पिता
शोषण करतो मुलिचे बाप ओळखणे कठीण झाले
**
माणूस माणूसपण विसरला ना नाते काही
पैशासाठी विकतो नाते भाऊ ओळखणे कठीण झाले
**
मुले म्हणजे देवा घरची फुले म्हणती त्यांना
वासना शमवितो कोणी नरा ओळखणे कठीण झाले
**
या पेक्षा जगणे काय असते हो ? खरे सांगाल का?
माणुसकीचे जगणे ओळखणे कठीण झाले
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१९-०९-२०१७

Marathi Kavita : मराठी कविता