Author Topic: तू मनाच्या सांजवेळी...(गझल)  (Read 361 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 237
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी

तू मनाच्या सांजवेळी...(गझल)
------------------
वेदनांना वाच तू डोळ्यात माझ्या
आसवांना ढाळ तू गालात माझ्या
**--**--
पाठमोरी तू अशी का लाजलेली
प्रीत माझी बावरी गाण्यात माझ्या
**१**
छाटलेले पंख माझे मी असा हा
मी मनाने संपलेला आंत माझ्या
**२**
पाहिलेका दू:ख माझे वाहणारे
काळजाचे घाव देव्हाऱ्यात माझ्या
**३**
तू मनाच्या सांजवेळी आठवावी
आठवांची सांगता जाण्यात माझ्या
**४**
रीत ही जाणून घे प्रीतीत राणी
प्रीत वेडी सांग की कानात माझ्या
**५**
हासणाऱ्या त्या कळ्यांना पाहिले मी
मी फुलांना पाहिले बागेत माझ्या
**६**
घे भरारी आसमंती तू सुखाने
ठाव घेई मुक्त तू चित्तात माझ्या
**७**
गाईले गाणे असे मूकेपणाने
भंगलेली प्रीत ही दीलात माझ्या
**८**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२४-०८-२०१७