Author Topic: चित्र  (Read 204 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
चित्र
« on: November 03, 2015, 06:05:10 PM »

तीच सफरचंदे , तोच जग … पाण्याचा
तीच झाडे , तोच ढग
पण चित्रांत मात्र तो असतो … फक्त सेझांचा


तीच शेते , तेच मजूर … खाणीतले
तेच वृक्ष, तेच तारे
पण चित्रांत मात्र ते बनतात … फक्त व्हान गॉघचे


तीच माणसे, तेच पेच … गुंतागुंतीचे
तीच बकरी, बैलही तेच
पण चित्रांत मात्र ते होतात … फक्त पिकासोचे


त्याच स्त्रिया , तेच घोडे … सूर्याचे
तेच कंदील , तेच जोडे
पण चित्रांत मात्र ते उरतात … फक्त हुसेनचे


तेच रंग , तेच फिरणे … रोलरचे
तेच पोत, तेच पाहाणे
पण चित्रांतील नि:शब्द गूढ मात्र असते … फक्त 'गाय' चे


- सतीश डिंगणकर

Marathi Kavita : मराठी कविता

चित्र
« on: November 03, 2015, 06:05:10 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):