Author Topic: आई  (Read 461 times)

Offline Sneha Mohan Jadhav

  • Newbie
  • *
  • Posts: 2
आई
« on: November 04, 2015, 12:53:30 PM »
आई

मी धडपडले , तू सावरलं
मी घाबरले , तू मला जवळ घेतलं
मी चुकले , तू मला मोठ्या मनाने माफ केलं
मी  खचले , तू माझ्या पंखांना बळ दिलं
आई , तू मला घडवलं
आई , तू मला घडवलं

माझ्या शब्दांतील आत्मविश्वास तू
माझ्या कल्पनांचा स्त्रोत तू
माझ्या यशाची प्रेरणा तू
अन माझ्या मनाचा हळवेपणा तू

तू भरवलेला प्रत्येक घास
माझ्या यशासाठी तुझ्या प्रयत्नांचा ध्यास
माझ्या आनंदासाठी धडपडणारा तुझा प्रत्येक श्वास
ह्या सगळ्याची जाणीव माझ्यासाठी खूपच खास

आई , तू जिव्हाळ्याची खाण
आहे मला ही तुझ्या कष्टांची जाण
गाजवेन असे कर्तृत्व ,वाटेल तुला अभिमान
आणि करतील लोक तुझा खूप खूप सन्मान

माझे केले गेलेले कौतुक खरतर तुझेच
गुपित माझ्या सुखाचे , नाते हे आपले
तुझ्यासारखी माउली लाभण्याचे भाग्य नसते साऱ्यांचे
म्हणूनच विनंती ही परमेश्वरास ,
प्रत्येक जन्मी हवे मला ऋण तुझ्याच मायेचे
प्रत्येक जन्मी हवे मला ऋण तुझ्याच मायेचे

-स्नेहा जाधव

Marathi Kavita : मराठी कविता