!! शिव राज्य !!
म्होरं डौलात बैलं पळती
त्यासी शिवराय हो हाकती
जिजाऊ ; मावळा सोबती
होते सुखानं रयत नांदती..!
होता सोन्याचा हो नांगर
सोन्याचीच पाबर होती
शिवबाच्या स्वराज्यात
होते सुखानं रयत नांदती..!
बळीराजाच होत इथं राज
सुखी आठरापगड जाती
हिरवाईच्या डोंगर कुशीत
होते सुखानं रयत नांदती..!
कवी:-रविंद्र कांबळे पुणे 9970291212