Author Topic: एखादं पुस्तक वाचून संपवल की  (Read 294 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186

एक माणुस वाचून काढल्या सारखं वाटतं,
एखादं पुस्तक वाचून संपवल की . . .
पण कित्येक पुस्तकं, मी अर्ध्यावरच सोडून दिलियेत,
आणि कित्येक माणसंचही . . .
तसचं झालय माझ्याकडून,
मला माणसं समजली नाहीत असं नाही,
आणि पुस्तकही मला अर्ध्यावर सोडायची नव्हती कधीच,
दोघांनबद्दलच्या जगण्याची उत्सुकता,
कायम रहावी तशीच . . . . . .
म्हणून मी या पुस्तकाना व माणसांना सोडत आलेलो नाहीय,
' वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन
उसे एक खुबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा .'
हे खरं असलं तरी,
न वाचली गेलेली अर्धवट पुस्तकं,
आणि न वाचली गेलेली कित्येक माणसं,
यांनी मलाच जणू न वाचलं गेलेंल
एक अर्धवट पुस्तक सोडलय करून . . .
एकदा निवांत बसून
स्वतालाच संपूर्ण काढायला हवं वाचून
म्हणजे
अर्ध्यावर सोडून दिलेली माणसं
कळतिल मला कदाचित
कदाचीत
अर्ध्यावर सोडलेली पुस्तकं ही मग
वाचाविशी वाटतील . . .
त्यातली कित्येक पानं
साठतिल माझ्या मनात
काही मनातल्या मनातच फाटतिल
जे उरेल ते तरेल
बाकि सगळ तसंच मरेल . . .


-सौमित्र