Author Topic: दिवाळी  (Read 1930 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
दिवाळी
« on: November 06, 2015, 07:20:55 PM »
दिवाळी

अश्विन कृष्ण द्वादशीला ।
असतो सण वसुबारस ।।
होते आगमन लक्ष्मीचे ।
पूजले जाते गाई-पाडस ।।१।।

अश्विन कृष्ण त्रयोदशीला ।
घडले समुद्र मंथन ।।
अमृतकुंभ घेऊन आले ।
झाले धन्वंतरीचे आगमन ।।२।।

अश्विन कृष्ण चतुर्दशीला ।।
नरक चतुर्दशी आहे सण ।।
उठून त्या दिवशी भल्या पहाटे ।
सूर्योदयापूर्वी करावे अभ्यंगस्नान ।।३।।

अश्विन अमावस्येला ।
होत असे लक्ष्मी पूजन ।।
व्हावी बरकत धन धान्याची ।
म्हणून होते कुबेराचेही पूजन ।।४।।

कार्तिक शुद्ध प्रतिपदेला ।
आहे सण बलिप्रतिपदा ।।
बळीराजाचे होता पूजन ।
सुख शांती नांदे सदा ।।५।।

कार्तिक शुद्ध द्वितीयेला ।
सण आहे भाऊबीजेचा ।।
बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा दिवस ।
योग बहिणीच्या घरी भोजनाचा ।।६।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ नोव्हेंबर २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता