Author Topic: नको जीवना रे  (Read 631 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,358
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
नको जीवना रे
« on: August 04, 2017, 10:11:51 PM »
नको जीवना रे

पहातोय सारा  तुझा डाव आता
कशा दावतो रे फुका भाव आता

पुरे आज  येथे  हि  खैरात सारी
उगा वाटतो ती तु मोकार आता

करा  माफ सारी  उधारी बळींची
तयारीत घेण्या गळा फास आता

सुरुवात माझी  जगायास झाली
नको जीवना रे  भिती दावु आता

धरावा सखे गं  कशाला अबोला
सुटे काळजाचा  इथे  धीर आता

कुणी  गोंदलेला  ठसा पावलाचा
कसे ते कळावे किनाऱ्यास आता

जळानेच माशा  असे  चिंब केले
भिजावेच त्याने  असे कर्म आता

नशा का चढावी  न  घेता जराही
तपासून आलो जरा स्टाँक आता

© शिवाजी सांगळे 🦋
« Last Edit: August 05, 2017, 03:39:10 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
अकरा गुणिले दोन किती ?  (answer in English number):