Author Topic: नवा कवी  (Read 152 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,211
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
नवा कवी
« on: December 28, 2017, 11:47:44 PM »
नवा कवी

शोधले जेव्हा सुखासह मीच मला
गाठले दु:खांनी तितक्यातच मला

मिटलेच ना मिटविता व्रण प्रेमाचे
कवटाळूनी होत्या जखमाच मला

काय लिहावे संभ्रमी अडलो तसे
खुणावले  पुन्हा  शब्दांनीच मला

हुजरेगिरी कळली  ती सोपी जरी
करणे तसे कधी ना जमलेच मला

कळले जसे  चोरांस हा कवी नवा
त्यांनी मग सोडले लागलीच मला

© शिवाजी सांगळे 🎭

संपर्क:९५४५९७६५८९
« Last Edit: January 05, 2018, 08:51:47 AM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता

नवा कवी
« on: December 28, 2017, 11:47:44 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Tulshidas shingne

 • Guest
Re: नवा कवी
« Reply #1 on: December 30, 2017, 01:22:42 PM »
आदरणीय सर तुमच्या कविता खुप आवडल्या मला पण एक अशी कविता हवी ज्यात शेतकर्यांसाठी आत्मीयता हवी , विद्यार्थीसाठी उर्जा आणि जगण्याची ईच्छा निर्माण व्हायला हवी

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,211
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: नवा कवी
« Reply #2 on: December 30, 2017, 01:54:44 PM »
तुलसीदास जी प्रथमतः आपण आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या बद्दल आपले मनस्वी आभार.
आपण म्हणता तशी कविता नाही लिहिली आजपावेतो, परंतू अनेक विषयांवर वेगवेगळ्याकाव्य प्रकारच्या कविता तसेच लेख आपण फेसबुक वर तसेच माझ्या http://shivsangle.blogspot.com या ब्लॉगवर आपणास वाचायला मिळू शकतील.
पुन्हा एकदा आपले आभार, असाच स्नेह राहो. धन्यवाद

Offline संजय जोशी

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Male
Re: नवा कवी
« Reply #3 on: January 01, 2018, 11:35:12 AM »
Khupach Chhan Shivaji Sir ... Tumhi swatahala "Nava Kavi" mhanta, pan khare tar tumhi khup murlele Kavi aahat ase vatate ...

Nava kavi tar mi aahe ..... Mi mazi pahili kavita "Poti Eik Mulagi Jarur Asavi' takali aahe ... krupaya vachun tumcha abhivray kalava ....


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,211
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: नवा कवी
« Reply #4 on: January 01, 2018, 11:56:01 AM »
संजयजी, प्रथत: नमस्कार व जागतिक नव वर्षाच्या शुभेच्छा.

आपण मला मुरलेले कवी म्हणालात त्याबद्दल आपले आभार. मी अजूनही शिकतो आहे म्हणून स्वतःला नवीन मानतो, तसं तर शिकण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरु असते, खैर आपली कविता "पोटी एक मुलगी असावी"  वाचून नक्की अभिप्राय कळवतो. (कृपया गैर समज नसावा)
« Last Edit: January 01, 2018, 11:59:41 AM by शिवाजी सांगळे »

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):