Author Topic: भान मनाचे  (Read 121 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,211
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
भान मनाचे
« on: January 04, 2018, 11:29:02 PM »
भान मनाचे

खिडकीशी कोण डोकावले येथे?
पहा कवडसे परत हासले येथे !

चाहूल लागता पावलांची जरा
ताटवे फुलांचे दरवळले येथे !

रोज गाऱ्हाणे समईस मुर्तीचे
काय काय ते नवस सोसले येथे !

होतीच जादू भजनात राऊळी
भान मनाचे असे हरवले येथे !

जेवढे समीप गेलो जीवनाच्या
खरे खोटे नमुने गवसले येथे !

हरवताच गर्दीत पुन्हा येथल्या
फिरून मला कोणी शोधले येथे?

© शिवाजी सांगळे 🎭

संपर्क:९५४५९७६५८९
« Last Edit: January 05, 2018, 08:50:53 AM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता

भान मनाचे
« on: January 04, 2018, 11:29:02 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):