Author Topic: जेंव्हा-तेंव्हा  (Read 447 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,345
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
जेंव्हा-तेंव्हा
« on: January 25, 2018, 08:44:23 AM »
जेंव्हा-तेंव्हा

गोडवा चहाचा कळला जेंव्हा
कान मी कपाचा धरला तेंव्हा 

झाली साखर अशी गोड जेंव्हा
मुंगिनेच  हात  फिरवला तेंव्हा
 
चहाला  पण  तेज आले जेंव्हा
मळा कसदार मी खुडला तेंव्हा

भुरका घेत  मग्न झालो जेंव्हा
टेकवला  ओठ  बशीला तेंव्हा

आधन लाविन मी पुन्हा जेंव्हा
सगळेच या  मग चहाला तेंव्हा

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता


Offline yallappa.kokane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 328
 • Gender: Male
Re: जेंव्हा-तेंव्हा
« Reply #1 on: January 31, 2018, 01:42:17 PM »
मस्त
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,345
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: जेंव्हा-तेंव्हा
« Reply #2 on: January 31, 2018, 01:56:29 PM »
धन्यवाद यल्लप्पा...