Author Topic: शेवटच्या बाकावरची पोरं  (Read 375 times)

Offline Dnyaneshwar Musale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
शेवटच्या बाकावरची पोरं
« on: February 03, 2018, 05:12:46 PM »
येता जाता टाईम पास
पेपर मध्ये नापास,
पण दोस्तीतल्या दुनियेचे
हे मित्र  मात्र खास.

यांना हुशार हा शब्द
म्हणजे एकदम चोरटा वाटतो,
पण वर्गात कधी कोणाचं दुखलं खुपलं,
तर  शेवटच्या बाकावरचा
मुलगाच जास्त जवळचा वाटतो.

शेवटच्या  बाकावर बसायला
सहजा सहजी कोणी मागत नाही,
रोज शाळेत हजर असलो तरी
त्यांची वही ही चुकुन कोणी
कधी माघत  नाही.

परीक्षा, अभ्यास असं
बरच काही समजवलं जातं,
त्यांनी कितीही अभ्यास केला
तरी निकालावर सवलत घेऊन
पास होऊन येत.

भीती, दडपण,निकाल,स्पर्धा
याचा कधी घोर नसतो,
कारण शेवटच्या बाकावरचा
कधीही एक मार्काचा सुद्धा चोर नसतो.

हजेरीवर शेवटच्या बाकावरचं
कधीच कोणी उपस्थीत नसतं,
निकाल नाही म्हटलं तरी
वर्ग आणि मैदान मनसोक्त गाजवलेलं असतं.

आता विषय येतो याचा
की शेवटच्या बाकावरची पोरं
म्हणजे टुकार, टवाळ आणि मठ्ठ असतात,
पण खरं सांगु हेच पोरं
ध्येय वेडी होऊन
हळु हळु इतिहास रचताना दिसतातं.

खरं तर बाक आणि फळा यातलं
अंतर किती यावर हुशार कोण हे काय
ठरत नाही,
एकदा का गणित समजलं तर बाकी कधीच
उरत नाही.

Marathi Kavita : मराठी कविता