Author Topic: कशाला हवा वारस?  (Read 90 times)

Offline Jayshri Tanavade

  • Newbie
  • *
  • Posts: 8
कशाला हवा वारस?
« on: June 09, 2018, 02:06:39 PM »
कशाला हवा वारस?
कशाला हवा मुलगा?

जरी झाली मुलगी
तुमच्या आयुष्याला देईल
ती ही अर्थ नवा

बाबा बाबा करत... साऱ्या तक्रारी
Share करेल
बेटा म्हणुन बोलवताना
तुम्हालाही अभिमान वाटेल

तिच्यासाठी मुलगा बघताना
तुमची जी धांदल उडेल
खरंच सांगते तेव्हा तुम्हाला
वेगळाच आनंद मिळेल

सासरी पाठवणी करताना
तिचं बालपण पुन्हा रडवेल
मुलीचा बाप म्हणुन जगलेलं सुख
तेव्हाच तुम्हा उमजेल

Mrs. Jayshri Tanavade


https://marathi.pratilipi.com/user/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-t820128bj5
« Last Edit: June 13, 2018, 09:40:19 PM by Jayshri Tanavade »

Marathi Kavita : मराठी कविता