Author Topic: माझ्या मनातील पाऊस  (Read 345 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 553
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
माझ्या मनातील पाऊस
« on: June 10, 2018, 02:51:33 PM »

सांगून तर मुळीच येत नाही
येरझार्या मारायला विसरत नाही
गुपचूप पाऊल टाकते संततधार
आठवण ठेवल्याशिवाय परतला नाही

असा माझ्या मनातील पाऊस ...

ठणकावून दाहीदिशी बजावतो
संतत मुसळधार मेघ कोसळवतो
काही दिवस स्वतःला दडवतो
भेटीसाठी पुन्हा मला आतुरोत्वो

असा माझ्या मनातील पाऊस ...
« Last Edit: June 10, 2018, 02:54:57 PM by कदम.के.एल »

Marathi Kavita : मराठी कविता