Author Topic: छत्री  (Read 310 times)

Offline Jayshri Tanavade

  • Newbie
  • *
  • Posts: 10
छत्री
« on: June 11, 2018, 02:00:40 PM »
मन मोकळं करून रडावसं वाटतं
पावसाच्या सरीसोबत हसावसं वाटतं

ढगांचा गडगडाट होताना
मिटावसं वाटतं

विजेचा कडकडाट होताना
मलाही लपावसं वाटतं

निर्जीव असुनही मला भावना आहेत
जगाला ओरडुन सांगावसं वाटतं

अडगळीतुन बाहेर यावसं वाटतं
मलाही भिजावसं वाटतं

jayshritanavade.blogspot.com


https://marathi.pratilipi.com/user/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-t820128bj5
http://jayshritanavade.blogspot.com/
« Last Edit: June 13, 2018, 09:39:33 PM by Jayshri Tanavade »

Marathi Kavita : मराठी कविता