Author Topic: ड्रेसकोड  (Read 83 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ड्रेसकोड
« on: June 12, 2018, 11:45:58 PM »
ड्रेसकोड

काय सांगू कुणाला कशाचे वेड आहे
बोलणेही कुणा कुणाचे प्री पेड आहे

फेसबुकवरच्या जत्रेतील नव्या जुन्यांना
चिमटे काढण्याची अतरंगी खोड आहे

मागताची कधी चुकून उधार कुणाकडे
नाही म्हणती बंदे थोडीच मोड आहे

म्हटले सरबराई करू जरा पाहुण्यांची
कळले मंडळी सर्व आधीच लोड आहे

जोखती एकदूसऱ्यास कपड्यावरुन हे
पहा पाळताती हल्ली ड्रेसकोड आहे

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता