Author Topic: ईच्छा  (Read 860 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,324
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ईच्छा
« on: July 11, 2018, 01:09:14 AM »
ईच्छा

कोण गातोय पहावा कशाला
मैफलीत ही वाहवा कशाला

धरेचा नभा बुलावा कशाला
सरींचा हा कांगावा कशाला

होय पावसात ईच्छा भजींची
डाळभात कोणा हवा कशाला

ठरवावा कुठे बेत फिरण्याचा
घरात मुक्काम ठेवा कशाला

पावसाचा या आस्वाद घेता
सर्दी पडशाची दवा कशाला

भाजी भाकरी खाता कष्टाची
काजू बदाम न् मेवा कशाला

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Deokumar

  • Newbie
  • *
  • Posts: 30
Re: ईच्छा
« Reply #1 on: July 17, 2018, 07:37:10 PM »
खुप छान....

Sachin jadhao

  • Guest
Re: ईच्छा
« Reply #2 on: July 29, 2018, 08:55:10 AM »
दोन विभावंतराचे टोक ...!!

अजून प्रश्न आहे मला या दोन विभावंतराच्या
टोकावरच्या पोटाचे ...
मीचं गुलाम मीचं मालक कि आणखी कोणता
असावा मी हे सुद्धा ...
तरी चालत असतो नेहमीच पोटासाठी मनात नसलं
तरी चालायचं ...
बसतो कधी धकून पण त्या दिवशी अंधार पडलेला
असतो चुलीत ....

चालतो मी रस्त्यात कि नुसता चालतो रस्ता
माझ्या बरोबर कधी ...
डोक्यावर काही नसलं तरी अमाफ आभाळ असतो
 छपरासारखा  ...
प्रेम जिव्हाळा संपला  तरी आधार असतो त्याच
आभाळाचा केवढा ...
आणि कधी तोही पण रागावून बसतच असतो
 माणसा सारखाच ...

त्या टपटप करून आवाज करणाऱ्या बुटाचा
असतो आधार फक्त...
मुर्दयाची गर्दी असली तरी माणसाची गर्दी
 नाही मिळत ना हल्ली ...
बघतो मी दोन्ही कडे, नसतात वेगळ काही पाहायला,
रोजचचं ते ...
असतात उपाशी झोपलेली काही, काहींनी असत अन्न
 दान केलेलं ...

बघतो कधी गल्ली आणि कॉलनी या मधील फरक
 सहज म्हणून ...
तरी प्रश्न पडलेला नेहमीसारखा जगायचे तर कसे
कोणा सारखे...
दोन टोके येथे पण येऊन उभी , माझ्या दोन टोकाच्या
विभांतरावर  ....
सुचत नाही तरी काय करावं जगण्या मरण्याच्या
टोकावर सुद्धा ....

गल्ली आहे येथे, येथे सुद्धा बोळ आहे पण माणसाचे
 चेहरे तेवढे ...
त्यांची ओळख करून देतात कोणाला  गल्लीत
 प्रवेश मिळेल  ....
भिक मागणारे आणि भिक देणारे याचं गल्लीत
 मिळत असतात ...
फरक एवढाच गल्ली गल्ली राहून जाते आणि
 कॉलनी शहर ....

भेटतात येथेच दोनच आण्या साठी तडफनारी
काही लोक ....
आणि दुसरीकडे दोन आणे असून सुद्धा अजून
 त्याच मागे ...
नाही समजले मला हे विभावंतराचे दोन टोक
 समजून सुद्धा ...
कदाचित मीचं केला असेल कानाडोळा नको
 म्हणून कधी  ....

●सचिन ना.जाधव
दिग्रस 

राहूल धनराज गावंडे

  • Guest
Re: ईच्छा
« Reply #3 on: August 11, 2018, 10:37:38 PM »
मी ऐक कवी आहे मला कविता लिहणे आणि वाचणे आवडते