Author Topic: दाखले  (Read 295 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,333
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
दाखले
« on: July 25, 2018, 08:17:26 AM »
दाखले

एक है म्हणता बरेच हात सरसावले
बघता बघता रस्त्यावर टायर पेटले

कशाला हवेत शत्रू कुणी शेजारचे?
स्वकीयांनीच फुटूनी भगदाड पाडले

कुणी घोटती लाळ स्वार्थी सत्तेसाठी
देशद्रोही असता त्या म्हणोनी आपले

करीत राहिलो कित्येक वल्गना खोट्या
ठसविता चुकीच्याच पावलांवर पावले

वाटू पाहतोय सत्तरीत देश आम्ही
पुरवीत नसत्या जात धर्माचे चोचले

तु रे स्वातंत्र्या सावर आता आम्हाला
इतिहासच मागेल दाखल्यावर दाखले

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता