Author Topic: कोण मी ? कोण मी ?  (Read 485 times)

Offline संजय जोशी

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
कोण मी ? कोण मी ?
« on: August 05, 2018, 04:25:28 PM »
घरातला कर्ता पुरुष हा नेहेमीच आपल्या कुटुंबासाठी झटत असतो .. त्याची व्यथा या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ..... रसिक माय बाप गोड मानून घ्या !!.
==========================================

कोण  मी ? कोण  मी ?
~~~~~~~~~~~~

              ~ संजय जोशी

प्रश्न  खूप आहेत पण, उत्तर मात्र सापडत नाही,
कोण मी ...कोण मी  ... ओरडतो मी अंधारात जीवाच्या आकांताने...
पण उत्तर माझे मलाच सापडत नाही  ...

कधी वाटते, वेलीला सहारा देणारा आधार वड मी ..
कुणाच्या तरी हुंदक्याला आसरा देणारा खांदा मी  ..

कधी तरी वाटते, कोणाच्या तरी स्पर्शाने घायाळ झालेले फुलपाखरू मी  ...
कधी वाटते, कि   इच्छा  आकांक्षाचे दान देणारा कल्पवृक्ष मी  ...

पण  मग  पेटून  उठतं हृदय ...
ओरडते, किंचाळते, म्हणते  ..नाही  .... नाही  तू  असा  ...

तू  आहेस  एक  हाडा मांसाचा माणूस .....
भावना , राग , लोभ  असलेला  एक  सामान्य माणूस  ...
तुला पण आहे एक हळुवार मन ....
एका फुंकरेला तरसणार हळुवार मन ...
जखमेने रक्तबंबाळ होणारे मन  ..

तुलाही वाटते कि बोलावे काही, मागावे काही  ...
कोणी तरी सावरावे तुला, द्यावा आधार  ...
तुलाही कधी हवा असतो एक खांदा, तुझ्या हुंदक्यांना समजून घेणारा  ..
तुलाही हवी असते एक मांडी .. जीवाला विसावा देणारी   ...

प्रश्न  खूप आहेत पण, उत्तर मात्र सापडत नाही,
कोण मी ...कोण मी  ... ओरडतो मी अंधारात जीवाच्या आकांताने...
पण उत्तर माझे मलाच सापडत नाही  ...

Marathi Kavita : मराठी कविता