Author Topic: माझ्या मनातला पाऊस  (Read 590 times)

Offline vishal dhavalekar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
माझ्या मनातला पाऊस
« on: August 18, 2018, 12:48:09 AM »
नभ उतरून आले
आज जामिनीवरती
मन हरवून गेले
गोड गारव्याच्या मधी

थेंब टीपुस हा आला
मन ओलवुनी गेला
याद तीयेची थोड़ीसी
मग देवूनिया गेला

मन झाले ओलसर
आल्या भावना दाटून
आता ओजळ वाहते
आठवणी साठवून

गेला पाऊस हा आता
झाले कोरडे हे आकाश
असा गोड्सर माझ्या
पावसाचा प्रवास
-विशाल ढवळेकर
« Last Edit: August 18, 2018, 12:50:00 AM by vishal dhavalekar »

Marathi Kavita : मराठी कविता