Author Topic: संसार  (Read 265 times)

Offline sharayukhachane

  • Newbie
  • *
  • Posts: 11
संसार
« on: August 24, 2018, 05:30:49 PM »
            संसार

गुलाबाच फुलं असा हा संसार
फुलतो पण मिळे काट्यांचा आधार

मंद मंद सुवास दरवादळतो अंगणात
पण बहरतो काट्यांच्या कुंपणात

प्रेमाची ही आंबट गोड चटणी
तर कधी लागे भांडणाची फोडणी

छोटसं घरटं पिल्लांसाठी बांधायचं
म्हणून हया संसारात गुरफटायचं

पिल्लांची पाखरं बनुन उडून जातात
चिमणा चिमणी त्यांची आस धरुन राहतात

सुख दुःखाच्या सावलीत खुलतो हा संसार
आयुष्यात कधी उजेड तर कधी येतो अंधार
           सौ. शरयू खाचणे💖

Marathi Kavita : मराठी कविता