Author Topic: डाव  (Read 428 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,324
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
डाव
« on: September 09, 2018, 12:10:29 PM »
डाव

घरच्यांच्या एकजूटीत चांगला ताव होता
पाडणे एकटे मला हा ठरला डाव होता

अचानक बोलणे त्यांचे लाघवी कसे झाले
साऱ्यांच्याच बोलण्यात साळसूद भाव होता

मान खाली घालून बोलणाऱ्या पोपटाच्या
हावभावात युद्ध जिंकल्याचाच आव होता

पाहिले न दप्तर, उचलले ना कधी पेन, तोच
समजत एक स्वतःला जणू बाजीराव होता

ठिक झाले तसे, होतो सावध घेऊन शंका
ठरलेला बेत त्यांचा, बरा मला ठाव होता

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता