Author Topic: भास कवडशांचे  (Read 404 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,349
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
भास कवडशांचे
« on: January 05, 2019, 12:54:38 PM »
भास कवडशांचे

सर्वव्यापी आसमंती
राज्य चालते सुर्याचे,
गर्द झाड पान रानी
रंग खेळ कवडशांचे !

चाळून सर्व दश दिशा
प्रकटन हे दिन रातीचे,
अस्तित्व उरे सावलीत
घेऊन रुप कवडशांचे !

तरंग उठती अनेक ते 
भावविभोर भावनांचे,
गत स्मृतीची आवर्तने
भास खेळ कवडशांचे !

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता