Author Topic: तुझा निरोप  (Read 102 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
तुझा निरोप
« on: May 19, 2019, 04:47:27 PM »
कोपरा कोपरा सुगंधीत झाला
फक्त निरोप आल्याने,

अत्तर, बत्ती फिके पडले
तुझं आगमन झाल्याने.

असणं त्या सुगंधाचं नाही
धुराचा स्पर्श जाणवतो,

धूर येतोच जाण्यासाठी
सुगंध कायम खुणावतो.

Marathi Kavita : मराठी कविता