Author Topic: पाऊल  (Read 43 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
पाऊल
« on: May 19, 2019, 05:06:58 PM »
मी चालतो पुढे
पाऊल एक एक,

मागच्या पाऊल खुणा
पुसणारे अनेक.

कोणी विचारतो
त्या पावलांचे गणित,

पुसट होतो ठसा
तो असतो क्षणिक.

पावलांची किंमत नाही
तर ठस्यांची किंमत कुठे,

पावले वर वर पडतात
ठसे आत आत रुते.

Marathi Kavita : मराठी कविता