Author Topic: मध  (Read 26 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
मध
« on: May 22, 2019, 09:05:09 AM »
मधमाशी आणि बरंच काही !
चेहरा जरी हसरा असला
तरी मन आत उदास आहे,
माशीला वेड मधाला चाखायचे
ओढ कुठेतरी त्या मधास आहे.

गुपचुप कोणतरी जात असेल
फुलात मध ओतायला,
आतुर झाल्यात सगळ्या माश्या
त्याला आधी भेटायला.

फुलात मध ओतण्याआधी
हिसकावून घेऊ सार,
एक एक फुल उमलायला
वेळ लागतो फार.

प्रामाणिक होत्या माश्या तेंव्हा
रांगेत उडत रहायच्या,
तासंतास त्या फुला बाहेर
वेटिंग लिस्ट असायच्या.

त्या दिवशी बिचारी माशी
दुकानाबाहेर दिसली,
असली नकली फुलांमध्ये
पुरती ती फसली.

फुलं नुसती फुलवली जातात
मधाला गोडपणा नाही,
आमच्यासाठी आहे का
अस पतंजली सारखं काही.

फोटो आमचा बाटलीवर
पण मध नाही आम्हाला,
एक बाटली मानधन चालेल
ठेवताय कधी कामाला.

पुन्हा कधी त्याच माश्या
फुलांभोवती दिसतील का,
वाट उमलण्याची बघता बघता
फुलांशेजारी निजतील का.

Marathi Kavita : मराठी कविता