Author Topic: छिद्र  (Read 23 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
छिद्र
« on: May 22, 2019, 07:26:32 PM »
हृदयाची छिद्र !
छिद्र पडली आहेत हृदयाला,
ठिगळं लावणं चालू आहे,
ढीगभर स्वप्नं साठवली होती,
आता गळण चालू आहे.

हृदयाच्या खाली एक,
छोटं हृदय हवं होतं ,
मोठं हृदय तुटलं तरी,
एक खोटं हृदय हवं होतं.

पट्टी केली हृदयाला,
आता गळण थांबलय,
स्वप्नं सगळी संपली बहुतेक,
नविन येणं लांबलय.

हृदयात आता काय साठवू,
भीती वाटते छिद्रांची,
दिवसभर झोपून काढतो,
तरी वाट बघतोय निद्रांची.

Marathi Kavita : मराठी कविता