Author Topic: आठवण  (Read 88 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
आठवण
« on: May 25, 2019, 11:57:23 AM »
आठवणींचा पूर !
काय करू या आठवणींचं
जिथे जावं तिथे दिसतात,
मी असलो की मला बघतात
मी नसताना पटकन वीजतात.

एकतर त्यांनी हरवून जावं
आणि मला पुन्हा भेटूच नये,
मला त्यांनी जवळ घ्यावं
पण थेंब माझे वेचुचं नये.

आभाळ झालं काळं आणि
दाटून आला ऊर,
संथ वाहणाऱ्या आठवणींचा
मोठा आला पूर.

वाटत होतं आठवणींना
वाहून जाऊ दे,
एकदा तरी त्यांनी माझ्या
डोळ्यात पाहू दे.

Marathi Kavita : मराठी कविता