Author Topic: कथा (भाग - ३)  (Read 533 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 150
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
कथा (भाग - ३)
« on: October 22, 2017, 05:46:54 PM »
कथा - भाग ३
       
        आज मन खूप खुश होते. तीच आणि माझं ट्युनिंग आता छानसं जमायला लागलं होतं. भांडायचो मस्ती करायचो, तशी मुलगी खूप डॅशिंग पण वाटायची आणि मनमिळाऊ.   मी अक्षरशः तिच्या प्रेमातच  पडलो होतो. पण मलाच खात्री नव्हती. तरीही दोन तीन दिवस तिच्यासोबत मन रमवून खात्री करून घ्यावी. बहुतेक मुलं आधीच एखाद्या गोष्टी कडे आकर्षले जातात. घरी आल्यानंतर झोप काही लागत नव्हती. मधून मधून तिचाच चेहरा डोळ्यासमोर यायचा. अन कधी झोप लागली कळालंच नाही. सकाळचा पुन्हा दिनक्रम चालू झाला. ऑफिस मध्ये समोर असलेल्या फाइल्स आटपून स्टॅम्प मारण्यासाठी पुढे पाठवल्या. तेवढ्यात मयूर आला आणि म्हणाला," आक्या.. अरे काय करतोस, हे बघ दोन एन्ट्री तर wrong मारल्या आहेत. त्यांनी फाईल्स पुढे करून म्हटले. "अरे लक्ष कुठे आहे तुझं"
"अरे सॉरी चुकून झालं असतील. लगेच change करतो.
"बरं राहूदे नंतर कर चल चहा घेऊ या"
तसच कॅन्टीन मध्ये येऊन त्याची बडबड सुरू झाली," काय म्हणतेय भूमी? भेटते की नाही..
"हो भेटते ना, यार मला असं वाटतंय मी तिच्या प्रेमात पडलोय.
"काय? अरे मग विचारून टाक ना" मयूर मात्र चहाचे घोट घेत मला उपदेश देत होता.
"अरे पण आता कुठे ओळख झाली आहे, लगेच कस विचारायचं? माझ्या मनातल्या शंका हळूहळू उलगडत गेल्या. कारण मयूर मला दीक्षा दाखवत होता.
एक काम कर तू तिच्या समोर बोलायला घाबरत असेल तर तिला कॉल करून बोलून टाक एकदाच...म्हणजे मनात काही राहणार नाही. मन हलकं तरी होईल.
मी पण तिला आताच सांगावं या उद्देशाने तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल ची रिंग तर वाजत होती, तशी माझी धडधड ही वाढत होती. आज तिला कोणत्याही परिस्तिथीत सांगून टाकायचंच. आणि अखेर कॉल रिसिव्ह झाला.
"हॅलो...भूमी मला तुझ्याशी बोलायचं होत, खूप दिवसापासून सांगेन सांगेन करता राहुन गेलं सांगायचं"
"हॅलो भूमी"..समोरून काहीच आवाज न आल्याने मी पुन्हा हॅलो म्हटले
"हॅलो...कोण पाहिजे तुम्हाला." समोरून रिस्पॉन्स आला पण आवाज तर कुठल्या पुरुषाचा वाटत होता. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. बहुतेक हा भूमीचा भाऊ देखील असू शकतो. मी मोबाइल कानाला लावून मयुरला डोळ्यानेच खुणवल, "त्याने ही मला फोन ठेवण्यासाठी इशारा केला. तसच मी दोन तीन वेळा हॅलो करून आवाज न आल्यासारखे करून ठेवून दिला.
"च्यायला बहुतेक तिच्या भावानी उचला फोन" मी मयुर ला सांगितले.
"एक काम कर तू तिला असं नको सांगू, तू तिला मेसेज करून कळव." मयुर पण मला भलत्याच कल्पना सुचवत होता
"अरे बस गप्प, आणि हा मेसेज पण तिच्या भावानी वाचला तर, लटकवशील लेका तू..."
आम्ही पुन्हा ऑफिस मध्ये कामात गुंतून गेलो. पुन्हा रात्र झाली हल्ली काम पण लवकर होत होते. ऑफिसच्या टार्गेट पेक्षा आता मला माझं वैयक्तिक टार्गेट महत्वाच वाटू लागलं होतं. भूमीला भेटण्यासाठी पुन्हा स्टेशनवर आलो. शेवटची लोकल पकडली. तिचा स्टॉप आल्यावर मी तिलाच शोधत होतो. पण ती काही दिसत नव्हती. आज भेटेल की नाही काय माहीत. बहुतेक आधीच निघून पण गेली असावी. आज शनिवार म्हटल्यावर त्यांना halfday असेल वगैरे. असेच काहीपण विचार मनात घुटमळत होते. आणि मागून पैंजनांचा आवाज आला. भूमीच होती ती. मागच्या गेट ने आली आणि मी मात्र पुढे शोधत बसलो होतो. काय माहिती कोणता perfume लावायची. गाडीभर तरी तो सुंगध दरवळत असेल."या मॅडम बसा..." मीच तिला बसण्यासाठी बाजूला सरकलो. आणि ती पण येऊन शेजारी बसली. बिचारी खूप दमली होती. तिच्या चेहऱ्यावरून टपणारे घामच सांगत होते. तिने बॅगेतुन बॉटल काढून एक दोन घोट घशात उतरवले. तशी ती रिलॅक्स झाली. "बोल कसं चाललंय काम..." तिनेच मला विचारलं
" मस्त चाललंय तुझं...
"माझं पण ठीक चाललंय
ती पुढे काहीच म्हटली नाही. मला वाटलं तरी हिला बहुतेक कळलं असेल मी तिला कॉल केलेला म्हणून पण तीच्या चेहऱ्यावरील हावभाव पण असा काही सांगत नव्हते. बहुतेक भावानीच हिला काही सांगितलं नसेल...शेवटी मीच तिला विचारलं
"काल माझा कॉल का रिसिव्ह केला नाही?"
"कधी केलेलास?
"कालच दुपारी 4 वाजता, हे बघ कॉल लिस्ट" मी तिला मोबाइल पण दाखवला.
"अरे पण काल मला तुझा कॉल च आला नाही?
" मी तुला कॉल केलेला बहुतेक तुझ्या भावाने उचलला?
"भावाने! मला कोणी भाव नाही आहे? मी तुला सांगितलं होतं मी एकटीच आहे माझ्या मम्मी पप्पांना.
"अरे पप्पानी उचलला असेल मग?
" तू please गप्प बस फोन माझ्याकडेच असतो." आणि तसं एवढं काय काम होत? भूमी ने चेहऱ्यावरील घाम पुसत मला विचारले.
"काम? नाही काही नाही... सहजच केला होता... पण हा तुझाच नंबर आहे ना." मी मोबाइल मधला नंबर दाखवून खात्री करून घेतली.
तिने ही हो म्हटलं. तसंच मी एकदा रिंग देऊन ही पाहिलं. पण तिच्या मोबाईल ची रिंग काही वाजत नव्हती. डिस्प्ले वर काहीच कॉल show होत नव्हता. कानाला लावलेला मोबाईल मधून रिंग वाजतेय पण इकडे काहीच रिस्पॉन्स नव्हता. खरच आश्चर्यकारक बाब होती. मी तिच्या कानाला लावून पण तिला रिंग ऐकवली. पण तरीही ती नालायका सारखी माझाच नंबर आहे म्हणून सांगत होती. आणि कॉल रिसिव्ह झाल्याबरोबर समोरील व्यक्तीने मला बेधडक शिव्या द्यायला सुरुवात केली. " अरे भो... कोण आहेस कोण तू? एवढ्या रात्रीचे कॉल करतोस, दोन तीन दिवस झाले तुझे सारखे मेसेज पण येतात... सारखे कॉल येतात. साल्या जास्त चरबी आली आहे का? पोलीस complaint करेल या पुढे कॉल करशील तर..."
मी तसा फोन कट केला. समोरून येणाऱ्या शिव्यांचा भडीमार. असं वाटत होत भूमीनेच मला फसवलं उगीच दुसरा नंबर देऊन माझ्या जीवाशी खेळत राहिली. बहुतेक तिला सुरवातीला माझ्यावर विश्वास बसला नसेल. पण म्हणून काय चुकीचा नंबर द्यायचा काय? काय करावं काय सुचत नव्हतं. त्यावेळी भूमीचा खूप राग आला होता. पण कशाला दिवस खराब करायचा. मनात तिच्याबद्दल काहीही वाईट विचार येत होते. पण नवीन नवी मैत्री होती. उगीच वादाला कारण नको.

क्रमशः...
« Last Edit: October 22, 2017, 05:47:24 PM by Ravi Padekar »

Marathi Kavita : मराठी कविता