Author Topic: कथा (भाग - ४)  (Read 486 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 150
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
कथा (भाग - ४)
« on: October 24, 2017, 12:01:27 AM »
कथा - भाग ४

         काय करावं काय सुचत नव्हतं. त्यावेळी भूमीचा खूप राग आला होता. पण कशाला दिवस खराब करायचा. मनात तिच्याबद्दल काहीही वाईट विचार येत होते. पण नवीन नवी मैत्री होती. उगीच वादाला कारण नको. जे तिला सांगायला आलो आहे ते सांगून टाकावं एकदाच, " बरं भूमी...
"हा बोल
" मला तुला एक सांगायचं होत, मला तू खूप आवडतेस" तुझा स्वभाव तुझं हसणं, लाजन आणि बरंच काही... नेहमी तुझ्याशी बोलत राहावं अस वाटायचं... पण एक भीती वाटत होती. मैत्री तरी टिकेल की नाही याची. पण एकदा ना एकदा हे मन मोकळं करायचं होतं .मला माहिती आहे मी खूप घाई करतोय, पण तुला हवा असेल तर तू जरा वेळ घे... नंतर तू सांगू शकतेस."
भूमी काहीच म्हटली नाही. ती शांतच होती. तिचा स्टॉप आल्या बरोबर ती निघून गेली तिच्याच विचारात. मी तर तिच्याकडे जात असतानाच पाहत राहिलो. पण यावेळी तिने मागे वळून ही पाहिलं नाही. मीच तिच्या समोर नवीन विषय ठेवून तिला विचारात पाडले होते... आणि गाडी देखील सुरू झाली.
               वातावरण ही ढगाळ झाले होते. पाऊस येणार असे वाटत होते. घाईघाईमध्येच स्टेशनवर पोहचलो. तरी काहीना काही तरी  विसरल्या सारख वाटत होत. खिशामध्ये हात गेल्यावर रुमाल नसल्याचं जाणवल. ऑफिस मध्ये आल्याबरोबर मयुरला शोधू लागलो. त्याला झालेला सर्व प्रसंग सांगितला. एकदाच मन तरी हलकं झालं. पण विचारांचं चक्र तर चालूच होत. भूमी आता काय विचार करत असेल, ती नक्की हो म्हणेल का?
"आकाश...कुठे हरवलास लेका? तिचाच विचार करतोय ना? अरे म्हणेल ती हो! डोन्ट वरी. मयुर ने बरोबर माझ्या मनातल ओळ्खल होत. वेळही आज लवकर जात नव्हती. कधी तीला भेटतोय अस झालं होतं. काम संपल्याबरोबर स्टेशन वर गेलो. नेहमीचीच लोकल पकडली. जस तिच स्टेशन आलं तशी नजर पूर्ण प्लॅटफॉर्म वर होती. काही जण गाडीमध्ये चढले. पण ती कुठेच दिसत नव्हती. आज आली नाही की काय कामावर? कुठे गेली असेल. रागावली तर नसेल ना माझ्यावर... नाही रागावली असती तर कालच तशी ती react झाली असती. पण मग... भलतेच विचार मनात येऊ लागले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा मयुरने मला विचारले. पण मीच काही बोललो नाही.  माझा पूर्ण मूड ऑफ झाला होता. जेवणाच्या वेळी त्याने पुन्हा विचारले. मग मीच न राहून सांगून टाकले.
"काल ती भेटली नाही मला, कळतं नाही यार बहुतेक रागावली तर नसेल. मला तर वाटत तिला हे आवडलेलं पण नसेल. मुली सहसा तेच गृहीत धरतात. मैत्रीच्या एक पाऊल पुढे गेल्यावर त्यांना आपल्याकडून तसं अपेक्षित नसत. पण मला नाही वाटत मी काही चुकीच केलं असेल. आयुष्यभर ती गोष्ट मनात ठेवून मी जगन कठीण केलं असत." मयुर सोबत मी खूप काही बोलून गेलो.
"अरे काहीतरी प्रॉब्लेम असेल तिचा पण, नाहीतर आजारी असेल भेटेल ती आज तुला"  मयुर पण मला दिलासा देत होता.
काम आटपून पुन्हा स्टेशन वर आलो. शेवटची लोकल पकडून पुन्हा आपल्या प्रवासाला निघालो. तीच स्टेशन आल्यावर आज तरी भेटेल या आशेने नजर मात्र तिलाच शोधत होती. पण आज ही ती कुठेच दिसत नव्हती. कळतं नव्हतं ती मला भेटण्यासाठी का टाळतेय. काहीच कळत नव्हतं. आता तर खूप मनस्ताप वाढायला लागला होता. तिच्याबद्दल वाईट विचार मनात येऊ लागले. पण तिचाही काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. घरच्यांना घाबरत असेल वगैरे  असे बरेच काही विचार मनात उसळत होते. दोन तीन दिवस असेच गेले...तिच्या शिवाय जगन आता मुश्किल झालं होतं. मन पण कुठे लागत नव्हतं. कॉल पण करू शकत नव्हतो. तिचा नंबर ही माझ्याकडे नव्हता. तीने मला चुकीचा नंबर का दिला असेल?
मला तिला भेटायची ओढ लागली होती. हो तिने मला सांगितलं होतं की ती दादर मध्ये इन्फोसिस कंपनी मध्ये काम करत होती. मी तिच्या कंपनी मध्ये जायचं ठरवलं. कंपनीच नाव विचारत विचारत मी त्यांच्या ऑफिस मध्ये पोहचलो. Receptionist जवळ जाऊन मी नाव सांगितलं," भूमी शितप" हिला भेटायचं आहे. तसं ती थोडी प्रश्नात पडली. तिने तिच्या कंप्युटर मध्ये employees लिस्ट पाहिले. पण कोणी भूमी शितप नावाची मुलगी नव्हती. तिने नाही म्हणून सांगितले," या नावाची कुठली मुलगी इथे काम करत नाही, तुम्ही तिला कॉल करून विचारा." तिने मला सांगितलं. भूमीचा माझ्याकडे नंबर नव्हता नाहीतर उगाच इथे आलो असतो का? मी मनातच म्हटले. मी तिथून निघालो. भूमीच मला काहीच कळत नव्हतं. ती मला सर्व गोष्टी खोट्याच सांगत गेली. पण का केलं असेल तिने असं. पण आता मात्र हा जाब तिला विचारायलाच पाहिजे. तिने मला का फसवलं. ती माझ्यापासून दूर का जातेय. पण यावेळी मी तिच्या घरी जायचं ठरवलं. तिने मला खूप गोष्टी share केल्या होत्या. म्हणून मला तिच्या घराचा पत्ता पण ठाऊक होता. ती भांडुप मधल्या टेंभीपाड्यातल्या वस्ती मध्ये राहायल्या होती. पण हा पण address जर चुकीचा निघाला तर...

क्रमशः

Marathi Kavita : मराठी कविता