Author Topic: अल्बर्ट आणि झिया (भाग- १)  (Read 59 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 150
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
Unstoppable Love... (भाग १)

मी विल्सन. डेक्कन मध्येच व्हाईट टाऊन मध्ये राहणारा. तसं सर्व लोक मला इकडे विल्स बोलतात. मी एक टॅक्सी ड्राइवर, गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करायचा. त्यावरच आपलं सर्व घर चालतं. तशी ही कथा आहे अल्बर्ट आणि झिया ची. आज सकाळी सकाळीच त्याचा कॉल आला. म्हटलं लवकर टॅक्सी घेऊन बस स्टँडवर ये, डोक्यात विचार आला पुन्हा त्या मुलींसाठीच बोलवलं असणार. मग काय एका मैत्री खातीर मी पण तिकडे निघालो. तशी अल्बर्टची आणि माझी मैत्री काय नवीन नव्हती. एकाच सोसायटी मध्ये राहणारे आम्ही दोघे.
बस स्टँड वर टॅक्सी घेऊन आलो. तसंच स्टँड वर ती नेहमीचीच मुलगी उभी होती. झिया. रंग गोरा, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर येणारे तिचे कलर केलेले हेअर, खांद्यावर अडकवलेली तिची गिटार, आणि शॉर्ट कॉस्टुम. गाडी स्टँड वर नेली तशी तिने हात केला, गाडीचे डोअर उघडून ती आत बसली. तसच दुसऱ्या डोअर ने अल्बर्ट आत शिरला. अल्बर्ट दिसायला सुंदर, त्याचे सिल्की असे हेअर, आणि मुळात त्याचा खट्याळ स्वभाव पाहुन अनोळखी माणसं आपलंसं करणारा.
"Excuse me? मी आधी गाडी पकडली आहे." झिया ने त्याच्या कडे पाहत म्हटले.
"हो पण आधी माझी नजर गेली होती गाडीवर."अल्बर्ट ने ही तिला प्रतिउत्तर दिले.
"सुरवातीला मी हात दाखवला आहे, तुम्ही उतरा प्लीज मला उशीर होत आहे?
"ये मी नाही उतरणार... मला पण उशीर होत आहे" अल्बर्ट म्हणाला.
दोघांची मचमच सुरू झाली.कोणी एक ऐकायला तयार होत नव्हतं. तेवढ्यात मीच म्हटलं, " अरे गप बसा, तुम्हा दोघांना पण स्टेशनवर जायचं आहे ना, मी सोडतो पण भांडू नका, उगच माझी सकाळ खराब नका करू. दोघंही शांत झाले आणि प्रवास सुरु झाला. झिया मात्र बाहेरची दृश्य पहात प्रवासात मग्न होती, आणि अल्बर्ट मात्र तिलाच मधून मधून न्ह्याहळत होता. मी आपलं नेहमीप्रमाणे Music ऑन केली. आणि म्हणालो अल्बर्ट ला," साहेब हे songs ऐकलं का?
"हो ऐकलं आहे. This is my favourite song." नवीनच अल्बम आहे हा.
"हा मग सांगा बरं हे सॉंग कोणी गायलं आहे?
"अरे ते अल्बम मधलं आहे, बहुतेक "nicy miller"
"काय? अहो "hazel dens" च आहे, नविन सिंगर आहे कुणी तरी.
तेवढ्यात झिया हसली. अल्बर्ट ने पाहिलं आणि विचारलं, " आता तुम्हाला हसायला काय झालं"
"काही नाही, आपलं असंच"
"असंच कसं काय, काहीतरी कारण असेलच?
"हो आता जे songs लागलं होतं ना ते मी गायलं आहे." असं झिया म्हटल्यावर अल्बर्ट आणि मी दोघंही हसायला लागलो.
" तुला ना भांडायला काहीही कारण लागत, हो ठीक आहे तू गिटार वाजवत असेल पण सिंगर आणि तू" अल्बर्ट ने पुन्हा तिची खिल्ली उडवली.
"हवं तर त्या CD वर बघा." झिया ने म्हटल्याबरोबर मी पण गाडी चालवता चालवता cd उचकून पाहिली." त्या वर सिंगर म्हणून 'झिया फेडरल' असं नाव होतं." अरे हो रे. ह्या तर सिंगर आहेत.
"झिया" nice name... खरं तर मला माहितीच नव्हतं पण तुमचे songs खूप आवडतात मला." अल्बर्ट म्हणाला.
"Ohh Thank you." तिने ही त्याचे आभार मानले.
"Can u give me ur autograph"
"Ok... तिने ही त्याला ऑटोग्राफ दिली आणि त्यांचं स्टेशन आलं.
"मग मला कधी शिकवणार संगीत. मला पण खूप शिकण्याची इच्छा आहे."
"हो शिकवेल ना, पण आता नाही मला खूप उशीर झाला आहे." एवढं बोलून झिया निघून गेली.
आम्ही दोघ मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो.
दुसऱ्या दिवशी पुन्हा अल्बर्टला झिया दिसली. त्याने तिला हाक मारली.पण तिने काही पाहिलं नाही.त्याने तिला विचारलं " hiii...झिया कशी आहेस?"
तिने एक गांभीर्याने त्याच्या कडे पाहिले आणि म्हणाली," कोण तुम्ही?"
"अग असं का करतेस कालच तर भेटलो आपण?
"पण मी नाही ओळखत तुम्हाला? Sorry...

क्रमश:....
« Last Edit: July 26, 2018, 11:37:23 AM by Ravi Padekar »

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले पाच किती ? (answer in English number):