Author Topic: अल्बर्ट आणि झिया (भाग- २)  (Read 335 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 150
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
अल्बर्ट आणि झिया... (भाग - २)

अल्बर्ट ने आपल्या बॅगेमधून एक कागद काढला आणि तिला दाखवला." ही बघ ही तुझीच sign आहे ना. तिने तो कागद पाहिला आणि काहीही न बोलता ती तिथून निघून गेली. अल्बर्ट ला काही सुचत नव्हतं. मी मात्र हा सारा प्रसंग दुरुनच पाहत होतो. मी आपली गाडी स्टार्ट केली आणि अल्बर्ट जवळ गेलो.
"काय राव एक पोरगी पटत नाही तुझ्याकडून" चल बस असं सारख मागे लागल्यावर कोण भाव देणार आहे तुला?
"तुझं भाषण झालं असेल तर चल आता?" अल्बर्ट पण संतापलेल्या अवस्थेमध्ये मला म्हणाला.
मी ही थोडा वेळ शांतच झालो. पण असा एकांतपणा मला शांत बसू देत नव्हता.
"तू ना एक काम कर, ही मुलगी सोडून दे, आपण आपल्या समोरच्या सोसायटी मधली 'एलिझा'ला पटवूया, अरे कुठे हिच्या मागे लागतोय आधीच ही सिंगर मोठ्या घरातली
मुलगी. भाव तर खाणारच.
अल्बर्टच काय लक्ष माझ्या कड नव्हतं. तो तिच्याच विचारात मग्न होता बहुतेक, इकडे माझ्या एकट्याचीच बडबड चालू होती.
" ये थांब थांब थांब... गाडी थांबव"... अल्बर्ट अचानक भानावर आल्यासारखा म्हणाला.
"अरे आता काय झालं?
बाहेर डोकावून पाहिलं तर तीच त्याची 'झिया' एका पुलाच्या ठिकाणी काहीतरी करीत होती. पुलाच्या शेजारी आडोशाला गाडी उभी करून आम्ही दोघे ती काय करतेय पाहत होतो. ती कुणाशी तरी किंवा स्वतःशीच गुणगुणत होती. पुलाखालून वाहणाऱ्या त्या पाण्याच्या एका दिशेने कुत्र्याचं गोंडस असा पिल्लू अडकलं होत. ते पिल्लू देखील जिवाच्या आकांताने स्वतःला पाण्याच्या वेगापासून सावरत होत. बहुतेक यासाठीच झिया काहीतरी प्रयन्त करीत असावी. पण तिला काय करावं काही सुचत नव्हतं. ती आजूबाजूला काही तरी साधन शोधत होती, जेणेकरून त्या पिल्लाला बाहेर काढता येईल. अशा ठिकाणी लोकांची ये जा पण जास्त होत नव्हती. सुसाट सुटनाऱ्या गाड्या त्याठिकाणी थांबणं अस काही संकेत ही दिसत नव्हतं. ती दुसरी कडे काहीतरी शोधू लागली होती. तेवढ्यात अल्बर्ट मला म्हणाला, " तू थांब इथे आलो मी" तो त्या ठिकाणी गेला आणि त्याने कसला ही विचार न करता त्या पुलाच्या बांधाचा आधार घेऊन खाली उतरला. त्याने त्या पिल्लाला आपल्या छातीशी कवटाळून वरती येण्यासाठी प्रयत्न केला. पण बांध जरा मोठा असल्याने अस सहज चढण शक्य नव्हतं. तेवढ्यात झिया तिथे एक रस्सी घेऊन आली. तिने अल्बर्टला त्या गोंडस पिल्लासोबत पाहिलं. तो मात्र वरती येण्यासाठी प्रयत्न करत होता. तिने त्याला हात दिला. तो तिच्या मदतीने वरती आला. आणि त्याच्या हातातील ते गोंडस पिल्लू झिया ने घेतलं. तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर अस स्मितहास्य पसरलं. तीने त्याला आकाशात फेकल्यागत एक गिरकी घेतली. आणि सोडून दिलं. अल्बर्ट पण तिच्याकडेच तिला झालेला आनंद पाहत होता. ती त्याला "thank you" म्हणाली. तो देखील वेलकम म्ह्णून ते पुन्हा चालू लागले.
" काय नाव तुझ?
"मी अल्बर्ट. डेक्कन मधेच राहतो. आणि तू
"मी fazia मध्ये.
" Ok. चल कॉफी घेऊया
तिनेही यासाठी सहमती दर्शवून ते दोघे कॉफी शॉप मध्ये गेले. त्यांच्या गप्पा आता रंगत जात होत्या. मी मात्र बाहेरच अल्बर्ट ची वाट पाहत बसलो होतो. त्याने तिला आपलंसं केलं होतं. आता दोघांची चांगली मैत्री जमली होती. पण यावेळी अल्बर्ट आणि ती दोघेही इतक्या गप्पा मारत होते जणू यांची मैत्री खूप काळापासून आहे असं वाटतं होतं. अल्बर्ट ने तिला यावेळी आपल्या मनातली गोष्ट सांगितली.
" झिया... मला आवडतेस तू, माझं प्रेम आहे तुझ्यावरती. Will you marry me?
"काय? झिया ने देखील आश्चर्याने विचारले.
" हो, मला खरच आवडतेस तू.
" अरे पण... झिया ला काय बोलाव कळत नव्हतं.
" मी अजून काही विचार नाही केला याबद्दल, आणि मला या गोष्टी मध्ये पडायचं नाही आहे"
"मग कर विचार आणि सांग मला?
" ओके मी सांगते उद्या?
" उद्या नाही आताच सांग. अल्बर्ट ने तिच्यावर एक तणाव निर्माण केला. असं विचारल्यावर ती थोडी बावरली. आणि म्हणाली.
" हो मला पण आवडलास तू, मुळात तुझं बोलणं. आणि तुझी धाडसी वृत्ती. त्या गोंडस पिल्लाला बाहेर काढलस तेव्हाच तुझ्यावर फिदा झाली. खर तर आधीच आवडला होता. पण म्हटलं नंतर सांगावं" झियाने एवढं बोलून आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केलं. अल्बर्ट ही खुश झाला. अल्बर्ट ने तिच्या कडे पाहून तिला मिठी मारली आणि तिचा हात हातात घेऊन चालायला लागले. बरं झालं त्या दोघांना एकदाच त्यांचं प्रेम मिळालं. मी पण त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसलो. आणि गाडी स्टार्ट करून पुन्हा आपल्या कामावर तत्पर झालो...

क्रमशः
« Last Edit: July 26, 2018, 11:48:10 AM by Ravi Padekar »