Author Topic: अल्बर्ट आणि झिया (भाग- ३)  (Read 124 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 150
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
अल्बर्ट आणि झिया (भाग-३)

झिया musician क्लास वरून घरी जाताना मला दिसली. मी गाडी घेऊन जात असताना तिला पाहिल. मी झियाला हाक मारली, पण तिने माझ्या कडे पाहून न पाहिल्या सारखे केले अन पुढे चालू लागली. मी गाडी पुढे घेऊन तिला लिफ्ट साठी विचारलं. पण तिने माझ्या कडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, "मी ओळखत नाही तुम्हाला"
असं म्हटल्या बरोबर मी म्हणालो. अग मी *'विल्सन'* मला नाही ओळखत का? काय झालं? भांडण केलस का अल्बर्ट सोबत?
"कोण अल्बर्ट? आणि मी का भांडण करू? झिया म्हणाली.
"म्हणजे तू अल्बर्टला ओळखत नाही. तुला प्रोपोस केलं काल तो?
" मी नाही ओळ्खत कुणाला" एवढं बोलून ती भरभर निघून गेली.
         
          संध्याकाळची वेळ होती. मी अल्बर्टच्या घरी गेलो तर घरात संपूर्ण अंधकार पसरला होता. बेल वाजून पाहिली तरी आत मधून काही प्रतिसाद येत नव्हता. म्हणून मी घराचे डोअर पुढे सरकावले तर दरवाजा उघडाच होता. मी आत मध्ये गेलो. अल्बर्ट म्ह्णून हाक मारली. पण काही रिस्पॉन्स मिळाला नाही. अजुन आत जाऊन पाहिले तर अल्बर्ट गॅलरी मध्ये बसला होता. त्याच्याच विचारात. मी जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, " अरे कधी पासून तुला हाक मारतोय? लक्ष कुठं आहे तुझं? आणि घरात काय एवढा अंधार करून ठेवलाय?
तो मात्र शांतच होता. खूप वेळ असाच
"हल्ली आयुष्यच अंधारमय झालंय." तो आपल्याच विचारातून बाहेर येत म्हणाला.
"अरे कसला अंधार काय? मला नेमकं काहीच कळत नाही आहे. तू काय बोलतोस ते. आणि झियाला काय झालंय. तुमची भांडण वगैरे झाली का. मी आज तिला भेटलो तर मला बोलते कोण तुम्ही? आणि कोण हा अल्बर्ट? एका दिवसात विसरली ही मुलगी. तू भांडलास का तिच्याशी?
"भांडण व्हायला तिने आधी मला ओळखलं तर पाहिजे ना."
"म्हणजे? मी अल्बर्टला म्हणालो
" झियाला गेली दोन वर्षे मी ओळखतो. आमची एका ऑडिशनच्या वेळी भेट झाली होती. आम्ही दोघांनी पण एका प्लेबॅक सिंगर साठी ऑडिशन दिली होती. ती ऑडिशन साठी जेव्हा आली तेव्हाच ती मला आवडली होती. खूप सारे कन्टेन्स्टंट आपला पेरफॉमन्स सादर करत होते. आमचा नंबर यायला अजून बराच अवधी होता. तेव्हा माझी आणि झिया ची ओळख झाली. दोघांनी पण ऑडिशन दिली पण आम्ही काय त्यामध्ये सिलेक्ट झालो नाही. 'झिया' सिलेक्ट न झाल्यामूळे ती खूप दुःखी झाली. तिचा चेहरा हिरमुसला होता.तिचे डोळेही पाणावले होते. मी तिची समजूत काढली आणि मग ती शांत झाली आणि ती तिच्या शहरात निघून गेली.
" मग पुढे काय झालं?" मी अल्बर्ट ला विचारलं.
"पुढे आमचं कॉलवर बोलणं वाढत गेलं. तिला माझा आणि मला तिचा स्वभाव आवडत गेला. दोघंही मैत्रीच्या एक स्टेप पुढे आलो. दोघही एकमेकांना समजून घ्यायला लागलो. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. पण अजून कुणी कुणाला सांगायला तयार होत नव्हतं. मी तिच्या साठी एक प्रस्ताव ठेवला. मित्राच्या मदतीने आम्ही एक अल्बम बनवायचा ठरवलं.
« Last Edit: July 26, 2018, 11:49:31 AM by Ravi Padekar »

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पन्नास वजा दहा किती ? (answer in English number):