Author Topic: अल्बर्ट आणि झिया (भाग- ४)  (Read 568 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 150
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
अल्बर्ट आणि झिया...

झिया देखील त्यासाठी तयार झाली. आम्ही अल्बम बनवला आणि रातोरात झिया स्टार झाली. अल्बम खूप फेमस झाला. तिने तिच्या यशाचं सर्व श्रेय मला दिल. त्या वेळी झिया ने मला लग्नासाठी विचारलं. आम्ही दोघांनी पण लग्न करायच ठरवलं. पण एका 'Music Entertainment' कंपनी मधून झियाला कॉल आला. Live परफॉर्मन्स साठी तिला विचारण्यात आलं होत. मी देखील तिला या साठी सहमती दिली. आणि शो सुरू झाला.
"मग पुढे काय झालं? मी आता एका उत्साहापायी अल्बर्ट ला विचारलं.
लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये झिया ने मस्त song गायलं. लोकांनी तिला टाळ्यांनी प्रतिसाद दिला. त्यावेळी मला तिचा अभिमान वाटत होता. तिने स्वतःला proove करून दाखवलं होत. पण अचानक काळाने घाव घातला. टाळ्यांचा आवाज स्टॉप झाला. अचानक धप्प असा जोरात आवाज होउन सर्व वातावरण शांत झालं. लोकांचा आनंदाचा जल्लोष आता शांत होऊन गोगांठ सुरू झाला. सर्व इकडे तिकडे पळू लागले. कारण झिया ज्या स्टेज वर गात होती तोच स्टेज झिया वर कोसळला होता. हे सारं दृश्य पाहून मी निस्तब्ध झालो. आणि कसाबसा स्टेजजवळ पोहचलो. झियाला मोठा मार लागून सर्व चेहरा रक्ताने माखला होता, मी थरथरत्या हाताने झियाला हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो. तिच्या जीवासाठी लाखो रुपये खर्च केले. तीन दिवसा नंतर झिया शुद्धीवर आली. मी तिच्या जवळ जाऊन बसलो होतो. मी फक्त तिचा हात हातात घेतला. ती माझ्या कडे एकटक पाहतच राहिली. खूप वेळ अशीच काही बोलली नाही.
मी तिला आधार दिला. होशील बरी तू आता. मी आहे ना तुझ्यासोबत. आता फक्त तू आराम करायचा. एवढंच तिला बोलून तिला एक दिलासा दिला. पण....
पण झिया म्हटली, कोण तुम्ही? आणि काय झालंय मला. प्लीज सांगाल का मला काय झालंय.
असं झियाने म्हटल्या बरोबर काळजात चीर झालं. मला शॉक बसला. मी डॉक्टरांना विचारलं," नक्की काय झालंय माझ्या झियाला?
तेव्हा डॉक्टर म्हणाले, "तिच्या डोक्याला जबर मार लागून मेंदूपर्यंत योग्यरीत्या रक्तपुरवठा होत नसल्याने तिची स्मरणशक्ती गेली आहे. ती तिच्या नजीकच्या लोकांना ओळखत नाही आहे.
तुम्ही तिच्यावर जास्त तणाव निर्माण करू नका. तिला जितकं मोकळेपणाने राहता येईल तेवढं चांगलं आहे. निदान परमेश्वर कृपेने काही झालं तर ठीक.
तिचे आईवडील तिला घेऊन गेले. त्या नंतर खूप दिवस आमची भेट पण झाली नाही. जेव्हा कधी तिच्या समोर मी जायचो तेव्हा तीच्यासाठी मी नेहमी अनोळखीच असायचो. आज जरी तिने मला ओळखलं तरी उद्या तिला याच विस्मरण होणार हे माहीत असूनही मी माझा प्रयत्न काही सोडला नाही. रोज एक नवीन ओळख घेऊन तिच्याशी मैत्री करायची, तिच्या सोबत आनंदाने काही क्षण घालवायचे. तेवढंच मला बरं वाटायचं. कारण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो.
उद्या पण एक वेगळीच ओळख घेऊन तिच्याशी बोलायचं, मस्त वाटत तिच्याशी बोलल्यावर. रोज हा खेळ जिंकून सुद्धा मी हरायचो. उद्या पुन्हा डाव मांडायचा जिंकण्यासाठी नाही तर प्रत्येक क्षण तिच्या सोबत आनंदाने घालवण्यासाठी. कधी तरी ती मला ओळखेल या आशेने आज दोन महिने झाले. मी आजही तिच्यासाठी अनोळखी आहे." अल्बर्ट म्हणाला.
हे सर्व ऐकून डोळ्यातून अक्षरशः खऱ्या प्रेमाचा एक अश्रू ढळला. " मित्रा नाही ओळखलं तुला मी, तुझ्या प्रेमात खरेच सच्चेपणा आहे. नक्की मिळेल तुला तुझं प्रेम" मी पाणावलेले डोळे पुसत त्याला म्हणालो.
नेहमीप्रमाणे अल्बर्ट एक नवीन ओळख घेऊन तिच्या आधीच येऊन तिची वाट पाहू लागला. ती आली बस स्टॉप वर,नेहमीप्रमाणे त्याचा कॉल ही आला. मी गाडी घेऊन बस स्टॉप वर गेलो. ठरल्या प्रमाणे गाडीत दोघेही आले. पुन्हा झिया भांडेल या आशेने अल्बर्टने भांडायला सुरवात केली. पण झिया मात्र शांतच होती. तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. अचानक अशी शांत बसल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. पण यावेळी ती हसली आणि म्हणाली... "अल्बर्ट"
तिने ओळख देण्या आधीच त्याला ओळखलं होत. तिची स्मरणशक्ती आता वाढू लागली होती. आम्ही दोघेही खुश झालो. अल्बर्ट ने तिला घट्ट मिठी मारली. आज खूप महिन्यानंतर त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. तिच्या घरच्यानी पण त्यांचं लग्न लावून दिल. आज दोघेही चांगला संसार करत आहे. दोघेही खूप सुखी आहे. शेवटी अल्बर्ट ने त्याच प्रेम जिंकलं होत.
End...

Writer- ✍रवि पाडेकर.(8454843034)