Author Topic: भेटी ॠणानुबंधाच्या...  (Read 815 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
भेटी ॠणानुबंधाच्या...
« on: November 17, 2015, 12:08:41 AM »
भेटी ॠणानुबंधाच्या...

मनुष्य प्राणी मुळतः सहवास प्रिय आहे, तो  फार कमीवेळ एकटा राहू शकतो, याचा अर्थ तो ज्याची अपेक्षा करतो तो त्याला प्रत्यक्षात भेटतो असे नाही. आपलं जीवन आज एवढ फास्ट आहे कि हर एकजण स्वतःलाच भेटत नाही, स्वतःलाच शोधत असतो.

तरी पण एक बरं आहे, सोशल मिडीया मुळे काही गोष्टी फार सुलभ झाल्या आहेत, प्रत्यक्ष नसे ना, फेस बुक, वाँटस् अँप वगैरे मुळे काही अशी दुधाची तहाण बिसलेरी वर भागते आहे. फेस बुक मुळे माझा अनेक लोकांशी स्नेह जुळला गेला, फार मोठा प्रेमळ वाचक वर्ग मिळाला, त्यातुन काहींशी अशी बंधन जुळली कि एकमेकांस अस वाटू लागले कि कधी प्रत्यक्ष भेट होते?

सोशल मिडीया कसा हाताळावा हा फार संशोधनाचा विषय आहे. जर तुम्ही सकारात्मक असाल तर काहीच अडचण नाही. अशाच आम्हा सारख्या काही मंडळीनी भेटायचं ठरवलं, त्या साठी परवा औरंगाबाद येथील यशस्वी चित्रकार, कवी, स्तंभ लेखक, पत्रकार व प्रकाशक असे चतुरस्त्र व्यक्तीमत्व श्री संतोष बक्षी, आमच्याच बदलापूरचे चारोळीकार, कवी श्री यल्लप्पा कोकणे व  डोंबिवलीचे नेहमी "बी पाँझिटीव" रहा म्हणत "मनाला वाटेल ते" लिहिणारे वात्रटीकाकार कवी श्री जयेश माधव हे माझ्या घरी एकत्र भेटलो.

ही भेट एक मंतरलेली, भारलेली भेट ठरली, एकतर कोकणे व मी सोडता बक्षी व माधव आम्हा दोघांना प्रथमच भेटत होते व आम्ही त्यांना, या सर्व दिड दिवसात परस्परांशी जरा सुद्धा नवखेपणा जाणवला नाही, कंटाळा तर नाहीच नाही आला. या उलट आता पर्यंतच्या आयुष्यात आलेले, घेतलेले अनुभव काही आठवणीची उजळणी प्रत्येकाने मन मोकळेपणाने केली, तो खुप सुंदर अनुभव होता.

भेटीत आम्ही एक संकल्प केला तो असा कि धावपळीच्या आपल्या आयुष्यात असे फेसबुक मित्रांच्या भेटीचे कारंजे फुलवित रहायचे, आपल्यातला माणुस सतत जीवंत ठेवायचा.

© शिवाजी सांगळे 🎭

Marathi Kavita : मराठी कविता