Author Topic: विरघळलेले क्षण  (Read 985 times)

Offline santosh mansute

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
विरघळलेले क्षण
« on: August 15, 2017, 09:28:13 PM »
विरघळलेले क्षण
============
👉लेखन :-श्री.संतोष बा.मनसुटे

          लहान पणी टिन पत्र्यांवर पावसाच्या आगमनाची टप टप लकेर वाजली की,बेभान होवुन पळायचो..पाण्याचे थेंब ओंजळीत धरायला...पावसाच पाणी भरण ही आमची  हौस ....टिना खाली बादली लावुन पाणी भरण हा खेळ...जागो जागी साचणार्या डबक्यात एक दोन साडे माडे तीन म्हणत एकसाथ उड्या मारायची मजाच वेगळी ...पाऊस ओसरल्या बरोबर नदीचा पुर पाहायला तर अख्ख गाव लोटायच धरंमयात.धरंमया हे आमच्या गावाजवळच शेत ज्याला लागुन नदी आहे..एका रांगेत उभे राहुन पाण्यात जीवन ड्राप टाकाव तसे लघुशंका करण्यात आमची बच्चेकंपनी पटाईतच होती..एखाद दुसरा गावातला काका- मामा यायचा अन मागुन चापट मारुन सांगायचा ,"ये पोर्या, होय न बे मागे जाशिल न बेभाव लेका." हो ला हो करुन आम्ही कटवुन द्यायचोच त्यांना..चपट्या दगडाला अंगठा अन अनामिकेत पकडुन नदीच्या पुरात  वरच्या वर तीन- चार टप्पे खात ज्याचा दगड जाईल ,तो हुशार ...हा पाण्यावर दगड मारण्याचा खेळ पुर आल्यावर लोकप्रिय़ असायचा..चुकुन एखादा कण्या दिसला की, त्याच्या शेपटी ला हात लावलायला फौजच मागे पडायची,कारण त्याच्या शेपटीला हात लावला की, परिक्षेत पास होतात,हे जनमानसात ठासलेल त्या वेळच अंतिम  सत्य होत..कण्या म्हणजे सापसुरडी..
           पाऊस पडल्यावर रस्त्यान चालन मात्र अवघडच असायच..पाटी ,वही ,पुस्तक बियाण्याच्या पिशवित कोमल का निघायचो आम्ही शाळेला, गारा तुडवत..एखादा मित्र डबकं चुकवत पाय भरु नाही म्हणुन कडे कडेन दगडावरुन तोल सावरत जायचा.. पावसाळ्यात शाळेतल्या बाई त्याच उदाहरण आम्हाला नेहमीच द्यायच्या ..पहा याच्या सारख निटनेटक राहत जा...तो राग मनात धरुनच आम्ही त्याला गार्यात ढकलून देत असु..आमच्या भाषेत सांगायच झाल्यास ,अद्दल घडवली की नाही. रायशिन लेका टापटिप...आमच्या स्वागता साठी शाळेतल्या शेवाने  बाई  बारदान्याच पोत दारात टाकुनच ठेवायच्या..पाय पुसायला..मी गोपाल अन गण्या नेहमीच शाळेत लेट जायचो खास करुन पाऊस पडल्यावर.. एकदा इंगळे गुरुजी न आम्हाला विस ची नोट दिली अन सांगितल, जा बसस्टँड वर अन १ पान आन अन  बाकीचे पैसे वापस आन..आम्ही नऊ पान आणुन दोन रुपये वापस केले.गुरुजी न चांगलाच समाचार घेतला होता...एकदा पाचवीत असतांना मनोहरराव जोशी आले होते शाळेत..महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते..त्यांनी शाळेत येताच भिका नावाच्या आमच्या मित्राला प्रश्न केला ,शाळेत गुरुजी शिकवतात काय? नाक पुसतच त्यान उत्तर दिल हो शिकवतात....नवघरे नावाचे मास्तर होते.ते आम्हा तथाकथित टवाळ पोरांना खुप मारायचे..अन म्हणायचेही ,हे पोरं  खुप हुशार आहेत पन बदमास भल्ले हायत लेकाचे...!!आमच मत होत भिकानं मुख्यमंत्र्याला सांगाव लागत होत  की ,गुरुजी लई मारत्यात...पन चानस गमावला लेकान ,म्हनुन नाकाला मुरड घातली आम्ही..तेव्हा पासुन तो वर्गातला सेलीब्रेटी झाला होता....पावसान दडी मारली की ,आम्ही धोंडी धोंडी पाणी दे म्हणत गावात फिरायचो..काठीच्या मधोमध उलटी बेडकी बाधुन दोन्ही बाजुला दोघ जन काठी पकडुन........
                          खरच खुप गोड होते ते दिवस....तेंव्हा वाटायच  लवकर- लवकर मोठ व्हाव...... आता मोठ झाल्यावर तेच दिवस आठवनीतले वाटतात....
          खुप शिकाव,मोठ्ठ व्हाव,बक्कळ पैसा कमवावा,गाडी घ्यावी ,घर घ्याव अन मग मजेत राहाव,  अस करत करत हातातले क्षण कधी विरघळुन जातात पत्ताच लागत नाही...कधी शिक्षण पुर्ण होते, कधी नोकरी -कामधंद्याला लागतो,कधी लग्न होते,कधी मुलाबाळांत अडकतो  अन कधी जबाबदार्या वाढुन अधिक पैसा- अधिक पैसा करत माणस मोठी होतात हे कळतच नाही..
..अन मागे वळुन पाहिल्यावर समजते आपण खुप दुर निघुन आलोय .....डोक्यावरचे केस कधी भोर्याचे काळे अन काळ्याचे पांढरे व्हायला लागतात हेच कळत नाही....
मग हरिवंशरायजींच्या ओळी आठवतात.....

सोचा था घर बनाकर बडी सुकुन से बिताऊंगा जींदगानी
लेकीन घर की जरुरतोने मुझे
मुसाफिर बना डाला.....
मुसाफिर बना डाला....

खरच विरघळलेत ते क्षण!!!

    👉लेखन:- श्री.संतोष बा.मनसुटे
रोहणा ता.खामगांव जि.बुलडाणा
9099464668
Santosh Mansute

Marathi Kavita : मराठी कविता