Author Topic: पोटा साठी स्वताच्या देहाच दुकान मी मांडल यात काय माझ चुकल...?  (Read 154 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
वयाच्या सतरा वर्षाची असताना
माझ लग्न झाल...
नवरा चागला कामाला होतो
चांगले कमवायचा देखील ...
लग्न झाल छान चालु होत आमच
मी घरीच असायचे..
शिक्षण तेवढ नव्हत माझ की
काही जाॅब करू शकेल..
त्या वरून तो सारखा चिडायचा
माझ्यावर...
असच चालु होत दोन वर्षांनी
आम्हाला एक मुलगाही
झाला ...
मी म्हणायचे आता नाही होऊ द्यायचा
एकच खुप आहे...
कशाला उगाच एकालाच चागल
शिकवू..
.
तर नाही ऐकलं त्याने 
तर अजुन दोन लेकर झाली
हा जायचा सकाळी निघुन
कमावर रात्री कधीही यायचा
तो पर्यंत या तिन लेकरांसोबत
कसातरी दिवस काढायचे..
उशीरा का आला विचारल तर
काम खुप होत वगैरे सांगायचा
मी जेवण करून आलोय तु जेवण
करून घे बोलुन झोपुन जायचा
मी डोळ्यात पाणी आणत कस
तरी दोन घास खायचे...
याच्यासाठी जेवायला थांबलेली
असायचे ना मी मग हा माझ जेवण
होई पर्यंत तरी माझ्या जवळ नाही
बसायचा...
.
एक दिवस हा अंघोळ करत होता
तर  याच्या मोबाईल वर फोन
आला आणि मी उचलला
तर पलिकडचा आवाज मुलीचा
होता ..
हा आला तर याला विचारलं कोण आहे
ति मुलगी वगैरे तर हा चिडला माझया
मोबाईला हात का लावला ..
मारल देखील मला...
आता तर पुढे खुपच झाल
पहिले तरी उशीरा का होईना यायचा
पण आता रात्र रात्र येत नव्हता
मी दरवाज्या जवळ बसल्या बसल्या
झोपी जायचे त्याची वाट पहात
सकाळी यायच विचारायचा देखी
गुन्हा असायचा नाही मारायचा
मी काहीच बोलत नव्हते...
.
नंतर नंतर मला समजल याच
बाहेर लफडी चालु आहे...
मी रडायचे ओरडायचे पण ऐकत
नव्हता फक्त मारायचा...
मी म्हणायचे आहो माझा नाही कमीत कमी
या दोन लेकरांचा तरी विचार करा..
आला तसाच परत निघुन गेला
मला काही कळत नव्हतं..
त्या रात्रीला तिला घेऊन घरी आला
लेकर झोपलेली होती
मी दार उघडलं तिला आत घेतल
त्याने मी कोण ही तर बोला माझी
बायको... माझ्या तर पायाखालची
जमीन सरकली..
रडुन रडुन पुर्ण डोळे लाल झाले
त्याला म्हटल एक तर मी इथे राहील
नाहीतर ही तुम्ही ठरवा काय करायच..
तर बोला ठिक आहे मीच जातो
हिला घेऊन कुठे तर निघुन..
.
मला वाटल गेला तर येईल सकाळ
पर्यत पण एक दिवस झाला दोन दिवस
झाले याचा काही तपास नाही
भिती वाटायला लागली
वाट पहाता पहाता महिना झाला
पण तो आलो नाही...
घरात जेवढे पैसे होते ते संपले...
काय कस सांभाळू या लेकरांना..
शेवटी काम शोधल एका
कंपनीत पोटा पुरते पैसे मिळायला
लागले कस बस त्यातुनच घर चालवायचे
लेकरांचा सांभाळ करायचे ..
पण जशी जशी लेकर मोठी होत गेली
तस तस खर्च वाढायला लागला...
मी जेवढे कमवायचे त्यातुन
काही पुर्ण नाही व्हायच...
.
एक दिवस रात्रीच घरी येतांना रस्त्यात
एक गाडी थांबली मी थांबले नाही
तो पुन्हा मांगुन येऊन गाडी
माझ्या जवळ उभी केली..
मी ओरडुन त्याला बोले काय आहे
घरी आई बहीण नाही का..
तर बोला एक रात्रीचे हजार रूपये
देईल चल आता तर खुपच राग आला
शिव्या दिल्या त्याला तशीच रडत
रडत घरी आले स्वयपाक
बनवला लेकरांना जेवण घालवुन
झोपवल...
पण मला झोप लागेना
सारख डोक्यात पैशांचा घोळ चालु होता
कस सांभाळु एवढ्याशा पैशात पोरांना..
.
शेवटी कठोर होऊन तोच निर्णय घेतला..
परत रात्री घरी येतांना ति गाडी माझ्या
जवळ येऊन थांबली...
पण आज काही न बोलता गाडीत बसले
त्याला गाडी माझ्या घराकडे घ्यायला
लाववी त्याने पण घेतली ...
मी त्याला बोले अर्धातास द्या मला मी
स्वयंपाक बनवुन पोरांना झोपुन येते
तर तो ठिक आहे बोला..
कसा तरी घाई घाई स्वयपाक बनवुन
पोरांना जेवण घालुन झोपी लावल...
आणि बाहेरून कुलुप लावली त्याच्या
गाडीत जाऊन बसले
तो मला त्याच्या रूमवर घेऊन आला..
.
मला फ्रेश वगैरे व्हायला सांगितलं
तो पर्यंत तो दारू पित बसला
मला देखील विचारल मी नकारार्थी
मान हलवली ...
मला बेडरूम मध्ये घेऊन गेला..
पिसाळलेल्या कुत्र्या सारखा माझ्यावर
तुटुन पडला...
त्याला हव तस मला रात्रभर भोगल
त्याला शरिराची आणि मला
पैशांची गरज होती..
पहाटे परत त्याने मला घरी सोडल
तशीच बाथरूम मध्ये गेले शावर चालु
करून रडत बसले पण काही
साध्य नव्हत होणार त्यातुन मला..
कस बस स्वताला सावरलं कारण
त्या शिवाय माझ्याकडे
दुसरा काही पर्याय नव्हता...
.
असच चालु रहायल आता त्याला जेव्हा
शरीराची भुक लागायची तेव्हा तो मला घ्यायला
यायचा ...
त्याच्या मित्रांशी त्याने ओळख करून
दिली ते सुध्दा यायचे कधी कधी
गाडी घेऊन त्यांना शरिराची आणि
मला पैशांची गरज होती...

पोटा साठी स्वताच्या देहाच दुकान मी
मांडल यात काय माझ चुकल...?
लेखक } प्रेम मांदळे... 🙏
.
लिखाणाचे अधिकार राखुन ठेवले आहेत पोस्ट
आहे तशीच पोस्ट करा नाव काढु नका क्रेडिट देत जा..
पोस्ट चोरून ईज्जत काढुन घेऊ नका..
धन्यवाद... 🙏