Author Topic: आज ति मला पुन्हा तिथेच धंद्याला उभी दिसली...  (Read 375 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
नेहमी प्रमाणे आज पण तिथेच धंद्याला उभी
होती...
न राहुन मी आज गाडी तिच्या जवळ थांबवली
आणि जवळ आली बोली चला साहेब कुठे चालेयच
आता रेट वाढले आहे तिनशे रूपये आणि कंडोमचे
पैसे वेगळे लागतील...
तिच्या त्या बोलण्यात देखील मला एक मजबुरी
दिसत होती ...
.
ठिक आहे बस गाडीत ति गाडीत बसली
तिच्या सोबत असणार्यानी गाडीचा नंबर नोट
करून घेतला ..
मी सरळ गाडी फाॅर्म हाऊस वर घेऊन आलो
गाडीच्या घाली उतरलो चहाचा थर्मस घेऊन
आत मध्ये गेलो दोघही..
तिला बसायला सांगितल चहाचे दोन
कप भरले ..
आणि तिला दिला मी एई चहाचा घोट
घेत विचारल..

का स्वताला रस्त्यावर उभ राहुन स्वताच
शरीर विकते ..
तिने माझ्याकडे बघीतल आणि चेहर्यावर
एक खोट हसु आणुन बोली
साहेब कुणाला हाऊस आहे स्वताला विकायची ..
साहेब वगैरे नको बोलु प्रेम नाव आहे माझ..
ठिक आहे बोलुन ति पुढे बोलु
लागली..
.
मी दहा वर्षाची होते तेव्हाच वडील
वारले एक लहान भाऊ बहीण आहे
आईने कस तरी आम्हाला वाढवल
आता आई पण सतत आजारी असते..
तिच्या दवाखान्याचा खर्च दोन लहान भाऊ
बहीण यांच्या शिक्षणाचा खर्च
सगळं माझ्यावरच येऊन पडल
बाहेर काम पण करायचे अगोदर पण
तेवढ्यात पुर होत नव्हत..
.
मग लग्न का केल नाही एखांदा
चांगला मुलगा बघु...
कोण करणार लग्न बाप नसलेल्या मुली कडे
पहाण्याचा चा लोकांचा दृष्टीकोण लगेच
बदललुन जातो ...
प्रत्येकाला तिच्यात एक वेश्याच दिसु
लागते ...
हे ईज्जत दार लोक स्वताची झाकुन
दुसर्याची वाकुन बघतात..
शेवटी आईची जास्तच तब्येत
खराब होऊ लागली..
.
पैश्यांची खुप गरज होती न
राहुन स्वताला या मध्ये झोकुन दिल ..
आता पैसा खुप भेटतो पण
माझ जे गेलय ते कधीच भेटणार नाही
माझ तर सर्व संपलच आहे
जगायच आहे म्हणुन जगतेय
माझ्या दोन भाऊ बहीणीवर ही वेळ
येऊ नये त्यांच चांगल व्हाव म्हणुन
स्वताला रस्त्यावर उभ राहुन विकतेय..
.
क्षण भर का होईना पण मी निशब्द
झालो डोळे भरून आलेले कस
तरी नजर चोरून सावरलो..
तेवढ्यात तिचा फोन वाजला
नविन गिराहीक आलंय बोली
आपल उरकुन घ्या मला जाऊद्या
धंद्यांचा टाईम आहे ..
मला नाही काही करायच फक्त
तुझ्या मनातल
जाणुन घ्यायचं होत मला
म्हणुन मी तुला इथे घेऊन आलो..

चक्क तिच्या डोळ्यात पाणी
उभ राहील..
आणि माझ्याकडे बघत राहीली
काय बोलाव काय कळेना तिला
फक्त मला जवळ घेऊन तिने माझ्या
कपाळावर किस केल..
पण त्या किस मध्ये मला वेश्या जाणवलीच
नाही आई जेव्हा कपाळावर किस करते ना
तसच काही जाणवल...
.
खिशातून हजार रूपये काढले आणि
तिला द्यायला पुढे केले तर
घेईना ति...
खुप दिवसांतुन माझ मन मोकळं
झाल नको मला पैसे बोली..
ठिक आहे चल सोडतो तुला परत तिथेच
परत दोघ निघालो
तिला तिथं सोडतांना तिने छान हसु आणुन
धन्यवाद बोली...
.
खरच अभिमान वाटला तिचा...
 .
लेखक } प्रेम मांदळे