Author Topic: आज चाललीये त्याला भेटायला...  (Read 576 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
एकाच काॅलेज मध्ये आहोत आम्ही दोघ
तो थोडा वयाने माझ्या पेक्षा लहान आहे
दिसायला सुंदर चेहर्यावर कायम चष्मा
एकदम साधा सिंपल...
त्याचा हाच साधा सिंपल पणा मला
खुप आवडतो ..
जास्त बोलणार नाही आपण विचारू
तेवढच बोलतो ..

मी जास्तच बडबड करते तो फक्त माझ्याकडे
बघत बसतो ..
एक दिवस न राहुन त्याने मला विचारल
मला आवडतेस तु मी काहीच न
बोलता तिथुन निघुन आले ..,
नंतर त्याने काॅल मॅसेज खुप केले
पण उचलले नाही..

आवडतो मला पण तो खुप पण
वयाने लहान आहे तो माझ्या पेक्षा
मनात प्रेम पण आहे माझ्या पण मला
नाही जमत आहे त्याला हो म्हणायला
शेवटी पुन्हा त्याचा काॅल आला
रडत रडत साॅरी म्हणत होता त्याला वाटल
मला राग आलाय मी ठिक आहे म्हणुन
त्याला विचार करून सागते बोले ..

आठ दिवस एकमेकांना भेटलो नाही
बोलो नाही मला त्याचा त्रास होत होता
शेवटी न राहुन त्याला काॅल केला
भेटायच आहे तुला ..
तो ठीक आहे पाथर्डी  ( नाशिक ) फाळके
स्मारकला उद्या चार वाजता भेटु बोला..
मी पोचले चार वाजता तो माझ्या आधी
तिथेच येऊन उभा होता..

मला बघतातच त्याच्या चेहर्यावर एक
वेगळाच आनंद दिसत होता ...
त्याच्या जवळ गेले तो चल गार्डन मध्ये बसु
बोला मी हो म्हणुन दोघ एका निवांत ठिकाणी
बसलो ..
दोघही थोड्या वेळ काहीच बोलत
नव्हतो न राहुन मीच
बोले..

कसा आहेस आठ दिवस भेटलो
नाही बोलो नाही..
तो ठिक आहे बोलुन नजर चोरत होता
त्याची ती अवस्था कळत होती मला
परत मीच विचारल का आवडते मी
तुला..?
त्याला काहीच कळेना काय बोलाव
बस बोला सवय झाली तुझी
तुझ नसन मला सहन होत नाही..
तुझ्यावर प्रेम झालय मला..
.
अरे पण मी मोठी आहे तुझ्यापेक्षा
कस शक्य आहे ते ..
प्रेमाला वय नसत बोलुन मोकळा
झाला त्याचा तो रडका चेहरा पाहुन
मलाच त्रास होत होता ..
माझ पण प्रेम आहे त्याच्यावर पण
उद्या काही प्रोब्लेम झाला तर
जग कस मान्य करेल नात्याला
असा असख्य प्रश्न मनात घोळ गालत होते
.
शेवची सगळं बाजुला सारुन
मी बोले त्याला आवडतो तु पण
मलाही प्रेम पण आहे तुझ्यावर
लग्न करशील माझ्याशी..
हे ऐकताच त्याने घट्ट मिठी मारली मला
आणि रडला मी त्याला समोर घेऊन
का रडतोय विचारल..
काही नाही असच म्हणुन हसु
लागला आणि आता लग्न करायला
तयार आहे म्हणाला..
.
आता मात्र मिच त्याला मिठी मारली
आणि त्या मिठीत एक वेगळाच मला आपले
पणाचा स्पर्श जाणवला...
शेवटी प्रेमाला वय नसत फक्त मन असत...
.
लेखक } प्रेम मांदळे