Author Topic: हम जब होंगे साठ साल के~~~  (Read 1016 times)

Offline santosh mansute

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
हम जब होंगे साठ साल के~~~
« on: August 24, 2017, 11:05:57 PM »
हम जब होगे साठ साल के~~~
======================
   👉लेखन :- श्री.संतोष बा.मनसुटे

आजही वाटत भिजावं पावसात
 मनसोक्तपणे.कशाला हवाय समाजमनाचा भित्रेपणा,भिजतांना पावसात..तिला म्हणावं बस पाठीमागे अन न्यावी गाडी लाँग ड्रायव्हींग ला बिनदिकतपणे हमखास,रिमझिमत्या सरीत अलगत भिजतं..अन म्हणावं  सत्तरच्या दशकातल एखाद पावसाच गाणं,रोमँटिकपणे....

पण नाहीच ना होत हल्ली तसंच काहीस..लग्ना आधी प्रत्येक जन वेगवेगळ्या मोबाईल कंपनीच्या रिचार्ज च्या स्किम विचारत फिरत असतो..कारण मनभर बोलन खिशालाही पचाव म्हणुन..अगदी तासनतास बोलुनही मन नाही भरत होणार्या बायकोशी ....मग लग्न झाल्यावर वर्ष दोन वर्ष झाल्यावर तिच्या आलेल्या काँल ला नेहमीच अस का उत्तर देतो आम्ही की,कामात आहे मी... नंतर फोन करतो ...निश्चितच उभयतांतल प्रेम नक्कीच कमी झालेल नसतच मुळात..पण जाणुन बुजुन एकमेकांना ग्रुहित धरतो आम्ही..अन सांगतोही मित्रांना...तिच तस काही नाही रे .... समजुन घेईल ती ,तिलाही माहित आहे ,नवरा कामात आसतो....बोल तू काय म्हणत होतास . अन् मित्रांशी असणार्या गप्पा आम्ही बिनदिक्कत चालुच ठेवतो..असच बायकाही करत नसतील,हे  कशावरुन  म्हनणार आपण..
      मुळात हे ग्रुहित धरण्याच ग्रुहितकच चुकीच असेल कदाचित.नाहीतर लग्नाच्या सुरुवातीच्या नव्या काळात आणलेला मोगर्याचा गजरा ,लाजतच बायका सांगतात की,तुमच्याच हातान वेणीत गुंफुन द्या .... मग वर्ष दोन वर्षांनी त्यांचच उत्तर ....,तो गजरा पहिले फ्रिज मधे ठेवा बरं ,सुकुन जाईल..अस का बर होत असेल..लग्ना नंतर तुमच्या आवडती भाजी करते आज,अस म्हणनारा आवाज ,मग ...आज भाजीला काही नव्हतं म्हणुन पिठलं केलं,घ्या लवकर जेवुन, असा का होतो ?
     प्रेम संपते ,कमी होते,किंवा त्यांच्या मनात दुसर काही चालल आहे काय? यातल काहीच बहुधा नसतच ,फक्त असते ते  ग्रुहित धरण्याच कारण  , हिच्यातही अन त्याच्यातही...
 नाहीतर आपल्या सोबत गप्पा मारत असतांना आपला अविवाहीत मित्र आलेला गर्लफ्रेंड चा काँल कधी कट करतांना बघितलाच काय?..मग आम्हीच का सांगतो गप्पांत दंग झाल्यावर ,ठेव फोन मी कामात आहे म्हणुन..तिनंही सोडाव ग्रुहिताच ओझ अन माराव्या दिलखुलास गप्पा अगदी त्याला आवडतात त्या विषयावर.अन बिलकुन यानही पुरवावाच तिचा हट्ट अगदी लग्ना आधी पुरवला तसाच..हिनही आदर राखावा त्याच्या भावनांचा अन् मनाचा मग तो ही राखेलच की तिचा आदर बिनधास्त पणे..शेवटी इगो जसा ह्याला आहे तसाच तिलाही आहेच की...अस झाल की मग का बर एकाच पलंगावर झोपलेले दोन चेहरे विरुद्ध दिशा पाहतील.
    पण डोळस पणे दोघही दुर्लक्ष करतात ,एकमेकांच्या भावनांचा अन इगोचा....मग होतो खेळ शब्दांचा....बंद दरवाजात...बोलक असुनही अबोलपणाचा....फेसबुकवर फ्रेंड्स गोळा करण्याच्या नादात घरातला फ्रेंड फार दुर निघुन जातो....कधी बायकोही करत नाही नवर्याला विश एखाद्या सणाचं अवचित्त साधून अन तो ही आनतच नाही एखादा गुलाब ,वँलेनटाईन डे ला..अन उत्तरही रुबाबात देतो...आता काय आपले दिवस राहिलेत काय ? दिवस हे प्रत्येकाचेच शेवटच्या श्वासा पर्यंतच सारखेच असावेत ना..का पटत नाही म्हातार्या आजीच आपल्या आजोबां सोबत त्यांच्या उतारवयात ....खर तर प्रेमाची साथ अधिक भक्कम व्हायला हवी त्यांची  अनेक उन्हाळे -पावसाळे खातं...पण नेमक उतार वयातच त्यांच जमत कस नसाव बरं.....?
     
   प्रेम हे तुमच आमच सारखच असतं
   पण,कधी घरकामाच्या गर‍ड्यात दबतं,तर कधी जबाबदार्यांच्या ओझ्याखाली चेमतं...
     नकोना ग्रुहीत धराव तिनं,अन त्यानही.....प्रेमाला वय नसतचं मुळात,असतं ते दिर्घ आयुष्य....गुनगुणाव गाण नेहमीच सत्तरीच्या दशकातलं.....
       
"हम जब होंगे साठ साल के
,और तुम होगी पचपन की.
बोलो तब भी बात करोगी,
बात हमारे बचपन की ।"
 
    ✍ *लेखन:- श्री.संतोष बा.मनसुटे
             रोहणा ता.खामगांवजि.बुलडाणा
📱9099464668
Santosh Mansute

Marathi Kavita : मराठी कविता