Author Topic: उरलेल्या जगण्याला, श्वासांची साठवण...!  (Read 533 times)

Offline Parshuram Mahanor

  • Newbie
  • *
  • Posts: 25
उघडी कवाडे, अन , तुटलेल्या भिंती,
आजवर जपलेली, अदृश्य नाती,

थोडंसंच स्वप्न, तुटण्याच्या भीतीनं,
पापण्यांत ठेवलं, कधीच नाही पाहिलं,

थोडीशी आपुलकी, थोडासा विश्वास,
थोडासा त्रास, थोडाच राहिला प्रवास,

थोडीशीच उरलेली, तुझ्यातली तू,
अन थोडासाच उरलेला माझ्यातला मी,

थोडंसंच प्रेम, अन, थोडीशी आठवण,
उरलेल्या जगण्याला, श्वासांची साठवण...!

-परशुराम महानोर

 माझा ब्लॉग
 https://pdmahanor.blogspot.in/

 https://www.facebook.com/parshurammahanor
« Last Edit: February 06, 2018, 04:37:22 PM by Parshuram Mahanor »