Author Topic: *** आठवणींचं मोरपिस ***  (Read 1233 times)

Offline धनराज होवाळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 239
 • Gender: Male
 • माझ्या लेखणीतून..
  • Facebook
*** आठवणींचं मोरपिस ***
« on: November 04, 2017, 08:56:27 PM »

❤ *आठवणींचं मोरपीस* ❤

पहाटेच्या स्वप्नात मला दिसलीस तु,
माझ्याकडे पाहून गोड हसलीस तु..
मग कुशीत येऊन माझ्या बसलीस तु,
मिठीत घेतल्यावर मस्तच लाजलीस तु..!!

आठवणींना घेऊन जगण्यात,
एक वेगळाच आनंद असतो..
एकटेपणात मग आपल्यात,
तेवढाच सदानंद असतो..!!

फक्त मनातच नाही तर,
हृदयात पण तुच आहे..
माझ्या प्रत्येक स्पंदनांत,
तुझ्याच नावाचा जप आहे..!!

तुझ्याशी मनसोक्त बोलायला,
मन माझं खुपच हरकलंय..
म्हणुनच गं सखे माझं हृदय,
तुझ्या हृदयाकडे फिरकलंय..!!

तुझ्याविना अजुन होतोय,
तुझ्या सोबतीचा भास..
येशील परतुनी कधीतरी,
एवढीच वेडी आस..!!

डोळे माझे अजुन लागलेत,
सखे तु येण्याच्या आशेवर..
वाट पाहत बसलोय तुझी,
तु येणारेस ना त्याच वाटेवर..!!

पहाटेची तुझी आठवण,
हृदयाला स्पर्श करुन गेली...
जाता जाता माझ्या हृदयात,
एक *मोरपीस* ठेऊन गेली...!!!
-
👼 *धनराज होवाळ* 👼
_कुंडल, जि. सांगली_
_मो. ९९७०६७९९४९._
🙏🏻💐❤🤴🏻❤💐🙏🏻

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: *** आठवणींचं मोरपिस ***
« Reply #1 on: November 19, 2017, 05:19:11 PM »
Kya baat dhanraj ji
Survat ekdam mast keli
Avdli kavita
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline धनराज होवाळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 239
 • Gender: Male
 • माझ्या लेखणीतून..
  • Facebook
Re: *** आठवणींचं मोरपिस ***
« Reply #2 on: December 08, 2017, 08:08:47 PM »
मनःपूर्वक आभार सर...🙏🙏🙏