Author Topic: have a nice day  (Read 472 times)

Offline Jayshri Tanavade

  • Newbie
  • *
  • Posts: 10
have a nice day
« on: May 31, 2018, 01:13:14 PM »
सकाळी सकाळी तुझी आठवण
हळूच कानाजवळ येते
हलकेच फुंकर मारून
have a nice day म्हणते

आरशासमोर उभारल्यावर
तुझेच प्रतिबिंब दिसते
अलगद मिठीत येऊन ते हि
have a nice day म्हणते

स्पर्शून येते हवा तुला
माझ्या भोवती मग भिरभिरते
काहूर माजतो मनात अन ती
have a nice day म्हणते

स्वप्न आहे कि भास हा माझा
जे मी तुझ्यासाठी जगते
आता मी हि येता जाता मलाच
have a nice day म्हणते

जयश्री तानवडे
« Last Edit: June 13, 2018, 09:59:15 PM by Jayshri Tanavade »

Marathi Kavita : मराठी कविता