Author Topic: .....आणि म्हणुन तुला विसरावसं नाही वाटलं  (Read 1315 times)

Offline jaydeshmukh2@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 14
तुला विसरण्यापेक्षा तुजा आठवणीत विसवताना मी हरवुन बसलो
....आणि म्हणुन तुला विसरावसं नाही वाटलं

त्या एका वळणावर तुला साेडुन जाताना,मी मला तुजात शोधण्यात हरवुन बसलो
....आणि म्हणुन तुला विसरावसं नाही वाटलं

आपला दुरावा हा तुझा हट्ट होता,नात्याचा घट्टपणा टीकवण्यासाठी तुझा हट्ट पुरवण्यात मी हरवुन बसलो
....आणि म्हणुन तुला विसरावसं नाही वाटलं

या गोड आठवणी तुला आठवतील आणि मला उचकी लागेल,
त्या उचकीची वाट पाहत मी स्वतःला हरवुन बसलो,
....आणि  म्हणुन तुला विसरावसं नाही वाटलं


कवी
संदेश घारे,विक्रोळी,मुंबई