Author Topic: तुझे वागणे हे कुणा सारखे ?  (Read 947 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186

तुझे वागणे हे कुणा सारखे ?
तगे वादळी त्या तृणा सारखे ..!


बिलंदर हासू त्यांचे जरीही
तुझे हासू निर्मल भृणासारखे !


जगी दाटली गर्दी जहरी कडू
तुझे बोल अमृत कणासारखे !


मुखे रंगती भडकरंगी किती ही
तुझे रूप कोवळ्या उन्हां सारखे !


किती भासते हासू कृत्रिम त्यांचे
तुझे लाजणे पण मनासारखे !


शरद दातार