Author Topic: जिंकण्याचा विश्वास  (Read 805 times)

Offline sameer3971

  • Newbie
  • *
  • Posts: 40
जिंकण्याचा विश्वास
« on: November 14, 2015, 01:14:27 PM »
पाण्याला समुद्राची गाज
ऐकू आली तर
त्याची नदी बनते
आणि सागराला जाउन मिळते
नाही तर पाणी डबकेच
बनून राहते.
तसेच जीवनाला विश्वासाची
जोड मिळाली तर आयुष्य
उत्तुंग भरारी घेते
नाही तर नैरशयेच्या
गरतेत अडकून राहते…

किती काळ नुसतेच
विचार करत राहायचे
कधी तरी बंड पुकारुन
उफाळुन वर उठायचे
समुद्रा गाज देताच असतो
पण आपण पाण्याचे रूप
घेऊन उसळायचे असते
भिडस्त होऊन त्यात
मिसळायचे असते.

वेळ येईल, वेळ जाईल
हिन्दोला जिंदगीचा
कधी उंच तर
कधी खालती होईल
आपणमात्र आपलीच
हार मानायची नाही
जिंकणार तर मीच हा
विश्वास कधी सोडायचा नाही


समीर बापट
मालाड मुंबई,

Marathi Kavita : मराठी कविता