Author Topic: प्रश्न?  (Read 805 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
प्रश्न?
« on: November 16, 2015, 09:14:38 AM »
प्रेम करायचं आहे तुझ्यावर
फक्त मनभरून प्रेम करायचं आहे
माहीत नाही माझ्या प्रेमाला
कधी नाव मिळणार कि नाही?
मनात दडलेली स्वप्न कधी
खरंच पुर्ण होणार कि नाही?
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सोबत राहिलं मी तुझ्या
पण माहीत नाही...
तु सोबत राहणार कि नाही?
होईल अट्टहास होतील भांडणे
कदाचित धिर तुझा पण खचेल
खंबीरपणे मी तुझ्या सोबतीला राहिलं
पण माहीत नाही...
तु माझ्यासाठी भांडणार कि नाही?
हळवी तशी तु खूप आहेस
मनाला त्रास पण करून घेशील
पण माझी आठवण आल्यावर
तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल कि नाही?
येईल हसू डोळ्यातील आसवांमागे
आठवशील तु मला प्रत्येक क्षणामध्ये
पण माहीत नाही...
तु मला पुन्हा दिसणार कि नाही?
गाणी तुझी ऐकणार मी रात्रभर
पापण्या सुद्धा ओलावतील तुझ्या स्वरांवर
लिहीलं मीही कविता तुझ्या आठवणीत
पण माहीत नाही...
त्या तु कधी ऐकणार कि नाही?
दूर जरी झालो आपण पण मात्र
प्रेम कधी कमी होणार नाही
जळतं राहू मनात, लोकही खुश होतील
पण माहीत नाही...
त्यांना हे सारं कळणार कि नाही ?
लहानपणापासून प्रेम करणे शिकविले
प्रेम केल्यावर त्याला चुकीचे ठरविले
ओढून ताणून ते दूर जरी घेऊन गेले
पण माहीत नाही...
प्रेमाचे रेशीमबंध कधी तुटणार कि नाही?
आयुष्य अवघड होत जाईल
विसरही हळूहळू पडत जाईल
मनावर लागलेल्या जखमा पण भरतील
पण माहीत नाही...
असं प्रेम पुन्हा कधी होणार कि नाही?

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com
« Last Edit: November 16, 2015, 09:15:12 AM by गणेश म. तायडे »

Marathi Kavita : मराठी कविता